निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील मधाळे परिवाराकडून भारतीय समाज सेवा संस्था, देवांश मनुष्य समाजसेवा निराधारांचा आधार, मत्तिवडे (ता. निपाणी) या संस्थेला वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त इतर खर्चाला फाटा देऊन जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम मदत स्वरूपात देण्यात आली.
राजू मधाळे म्हणाले, आमच्या वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त, घरामध्ये वडिलांच्या फोटोचे पूजन करून नैवेद्य दाखवून, या समारंभासाठी येणारा खर्च अनाथ निराधार अशा व्यक्तींना व्हावा, या उद्देशाने, देवांश मनुष्य समाजसेवा. मत्तिवडे येथील या निराधारांच्या आश्रमासाठी साखर, गहू, ज्वारी तांदूळ, सोजी, रवा, गुळ, गोडे तेल, साबण व अन्य जीवनावश्यक वस्तू दिल्या. तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या विकास कामासाठी म्हणून पाच हजार रुपये रोख आमच्या कुटुंबाकडून या संस्थेचे संस्थापक, अमर पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
मधाळे कुटुंबाकडून जीवनाशक वस्तू व रोख रक्कम मिळाल्याबद्दल अमर पवार यांनी कृतज्ञ व्यक्त केली.
या कार्यक्रमाला पांडुरंग मधाळे, संगीता कांबळे, लता जाधव, सुनंदा मधाळे व आश्रमातील निराधार व्यक्ती उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta