भाजीपाला मित्र मंडळातर्फे आयोजन : उत्तम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील भाजीपाला मित्रमंडळ यांच्या वतीने दीपावलीनिमित्त आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीत मिरज येथील शंकर घोगरे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवून रोख १५००१ व निशान बक्षीस मिळविले. प्रारंभी युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते शर्यत मैदानाचे उद्घाटन करण्यात आले.
बैलगाडी शर्यतीत बंडा खिलारे-दानोळी द्वितीय, प्रवीण डांगरे- इचलकरंजी यांच्या गाडीने तृतीय क्रमांक मिळविले. त्यांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार व ७ हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आले. जनरल घोडा बैल शर्यतीत बंडा हसवे-हावेरी प्रथम, अभय गोरवाडे- बोरगाव द्वितीय व सदाशिव पाटील बस्तावडे यांच्या गाडीने तृतीय क्रमांक मिळविले. त्यांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार व ३ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
जनरल घोडा-गाडी शर्यतीत शिवाजी निकम-बोरगाव प्रथम, अभय गोरवाडे- बोरगाव द्वितीय व सचिन पाटील- चंदूर यांच्या घोडा गाडीने तृतीय क्रमांक मिळवले. त्यांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार व ३ हजार रुपयांचे बक्षीस व निशान देण्यात आले. सर्व बक्षीस भाजीपाला मित्र मंडळ यांच्या वतीने देण्यात आले. दिवाळीनिमित्त आयोजित शर्यती पाहण्यास नगरसेवक, भाजीपाला मित्र मंडळाचे पदाधिकारी शहरवासीय तसेच शर्यत शौकीन उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta