विविध कार्यक्रमाचे आयोजन : कव्वालीचा बहारदार कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : येथील श्री संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांच्या उरूसास अभंगस्नानाने सुरुवात झाली होती. यानंतर शनिवारी (ता.२९) दर्गा, समाधीस्थळी सनई चौघडे वादनास सुरुवात झाली.
उरूस उत्सव कमिटी अध्यक्ष बाळासाहेब देसाई सरकार, संग्राम देसाई सरकार, रणजीत देसाई सरकार, पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मानकरी असलेल्या कोरवी समाजाने सनई चौघडे वादनास सुरुवात केली. उरुस उत्सव पूर्ण होईपर्यंत हे वादन सुरु राहणार आहे. यावेळी आप्पासाहेब कोरवी, महादेव कोरवी, नारायण कोरवी, बाबुराव कोरवी, श्रीकांत कोरवी, संजय कोरवी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
शनिवारी (ता५) ते सोमवारी (ता.७) नोव्हेंबर असे तीन दिवस उरुस उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अखिल भारतीय चंद्रदर्शन कमिटीने यंदा एक दिवस चंद्रोदय उशिरा होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्या सूचनेनुसार निपाणीतील उरुस एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती उरुस उत्सव कमिटी अध्यक्ष बाळासाहेब देसाई सरकार यांनी दिली.
सोमवारी (ता.६) ते मंगळवारी (ता.८) नोव्हेंबरअखेर उरुस भरणार असून सोमवारी (ता.७) भर उरूस असणार आहे. गुरुवारी (ता.३) नोव्हेंबर दर्गा चुना लावणे, शनिवारी (ता.५) रोजी चव्हाण वारसांच्या हस्ते मंडप चढण्यात येणार आहे. रविवारी (ता.६) गंधरात्र असून गंध चव्हाणवाड्यातून मिरवणुकीने निघणार आहे. या दिवशीच बेडीवाल्यांचा उरूस आहे.(सोमवारी ता.७) भर उरूस असून यादिवशी चव्हाणवाड्यातून येणारा गलेफ पहाटे चढविण्यात येणार आहे. मंगळवारी (ता.८) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिजामाता चौक, चव्हाणवाडा येथे खारीक व उदीचा कार्यक्रम होणार आहे. या दिवशीच शिळा उरूस आहे. बुधवारी (ता.९) मानाचे फकीर यांची रवानगी व भंडारखाना तसेच शुक्रवारी (ता.१२) पाकळणी कार्यक्रम होणार आहे. उरूस काळात रात्री आठ वाजता चव्हाणवाडा येथे आतषबाजी होणार आहे. सोमवारी (ता.७) सकाळी नऊ वाजता अंमलझरी रोडवरील आंबेडकर नगरात बैलगाडी, घोडागाडी तसेच गाडीमागून श्वान पळवण्याच्या आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी सोमवारी (ता.७) रोजी रात्री साडेनऊ वाजता जुगलबंदी कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी (ता.८) दुपारी ३ वाजता म्युनिसिपल हायस्कूल येथील संत बाबा महाराज चव्हाण कुस्ती मैदानात भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या दिवशी रात्री ९.३० वाजता प्रसिद्ध कव्वाली गायक छोटे चांद कादरी-इंदौर यांचा भव्य कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta