Tuesday , March 3 2026
Breaking News

ओलम अग्रो इंडियाकडून कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान

Spread the love
ओलम कारखान्यामार्फत बिझनेस हेड भरत कुंडल कोविड सेंटरसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देताना सोबत आमदार राजेश पाटील.


तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ओलम अग्रो इंडिया प्रा. लि. राजगोळीकडून खु. ता. चंदगड, या कारखान्यामार्फत चंदगड तालुक्याच्या कोरोना बाधित रूग्णांसाठी 10 लिटरची तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आली.
ओलम साखर कारखाना आपत्ती काळात नेहमीच शेतकर्‍यांच्या पाठीशी राहतो. यामुळेच कोविडसारख्या या कठीण परिस्थितीत कोविड सेंटरसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देवून सामाजिक दातृत्व स्विकारले.
यावेळी चंदगडचे आमदार राजेश पाटील, चंदगड तहसिलदार विनोद रणावरे, आरोग्य अधिकारी श्री. खोत, ओलम कारखान्यामार्फत बिझनेस हेड भरत कुंडल, मुख्य शेती अधिकारी सुधिर पाटील, एच. आर. अजिज झुंनझानी, अनिल पाटील, नामदेव पाटील, रमेश पाटील, गणपत पाटील, दयानंद देवण आदि आधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *