पोक्सो प्रकरणातील खटल्याला स्थगिती बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना पोक्सो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला आहे. येडियुरप्पा आणि इतर चार आरोपींनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश स्थगित केला. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर …
Read More »LOCAL NEWS
बेळगाव एपीएमसी नेमदी केंद्रात अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार
बेळगाव : बेळगाव येथील एपीएमसी मार्केट परिसरात असलेले नेमदि सेवा केंद्रातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्यामुळे नागरिकांना ग्राहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर नेमदी सेवा केंद्र सकाळी एक -दोन तास खुले राहते त्यानंतर दुपारच्या जेवणाची सबब देत अधिकारी हे सेवा केंद्र बंद करून जातात ते पुन्हा अधिकारी सेवा …
Read More »चक्क एटीएम मशीनच दरोडेखोरांनी पळवली; पण प्रयत्न अयशस्वी!
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील न्यू वंटमुरी गावात राष्ट्रीय महामार्ग 48 वर दरोडेखोरांनी एटीएम मशीनच ढकलगाडीवर (हातगाडी) वरून घेऊन पळविल्याची घटना घडली. याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी, 3 दरोडेखोर प्रथम एटीएममध्ये घुसले आणि तेथील सेन्सरला आवाज येऊ नये म्हणून स्प्रे मारला. नंतर त्यांनी एटीएम मशीन ढकलगाडीवर ठेवून 200 मीटर गाडी चालवली. …
Read More »अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार!
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड पोलीस स्थानकाच्या हद्दीत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. पीठ गिरणीवर जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने ओढत उसाच्या शेतात नेऊन तिला मारहाण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला असल्याची माहिती उशिरा उघडकीस आली आहे. मुरगोड पोलीस स्थानकाच्या …
Read More »काँग्रेसमधील सत्ता वाटपाचे वाद निवळले?
सिद्धरामय्या–शिवकुमार यांची दुसरी ‘नाश्ता बैठक’ बंगळूर : काँग्रेसमधील सत्तावाटपाचा वाद कमी झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आठवड्यातील दुसऱ्या ‘नाश्ता बैठकी’त उपस्थित राहून पुन्हा ऐक्याचे दर्शन घडवले. सदाशिवनगर येथील शिवकुमार यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांनी आज सकाळी एकत्र नाश्ता करत राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा केली. …
Read More »यावर्षी आंदोलनांची तीव्रता कमी दिसून येईल : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
बेळगाव : पुढील आठवड्यापासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान यावर्षी आंदोलनांची तीव्रता कमी दिसून येईल अशी आशा, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बोलून दाखवली आहे. आज मंगळवारी त्यांनी सुवर्णसौध येथील कामकाजाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अधिवेशनाच्या दरम्यान बेळगावात येणाऱ्या मंत्री, अधिकारी तसेच अन्य मान्यवरांसाठी …
Read More »येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक गुरूवारी
बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक गुरूवार दि. 04/12/2025 रोजी सायंकाळी ठीक 7.00 वा. विभाग म. ए. समितीच्या कार्यालयात बालशिवाजी वाचनालाय येथे होणार आहे. सोमवार दि. 8 डिसेंबर 2025 रोजी होणारा महामेळाव्यानिमित्त बैठक होणार आहे. तरी या बैठकीला आजी- माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, ग्राम पंचायत, …
Read More »इंदिरा फूड किटसाठी रास्त भाव दुकानांमध्ये क्यूआर स्कॅनिंग अनिवार्य
बंगळूर : राज्यातील रास्त भाव दुकानांमधून इंदिरा फूड किटचे वितरण अधिक पारदर्शक करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी क्यूआर स्कॅनिंग अनिवार्य करण्याचे आदेश अन्न विभागाला दिले आहेत. अन्नभाग्य योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अतिरिक्त ५ किलो तांदळाच्या बदल्यात इंदिरा फूड किट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आधीच मंजूर केला आहे. सोमवारी बंगळुर येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री …
Read More »माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांना पत्नीशोक
येळ्ळूर : मूळच्या येळ्ळूरच्या व सध्या रा. नाथ पै. सर्कल शहापूर बेळगाव येथील रहिवासी सौ. शांताबाई परशुराम नंदीहळ्ळी (वय 90) वर्षे यांचे वार्धक्याने सोमवार (दि. 1) रोजी सायंकाळी निधन झाले. गुरुवर्य व माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे, पणतवंडे असा …
Read More »मार्कंडेय नदीतील मृत जनावरे बाहेर काढून नदीपात्राची स्वच्छता
बेळगाव : मार्कंडेय नदीपात्रात मृत जनावरे फेकण्यात आल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येची गांभीर्याने दखल घेणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून आज सकाळी क्रेनच्या सहाय्याने पात्रातील मृत जनावरांना बाहेर काढून नदीपात्र स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव शहरानजीकच्या मार्कंडेय नदीपात्रामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांत सहा डुक्करं, दोन मेंढ्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta