Monday , December 15 2025
Breaking News

LOCAL NEWS

पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयमध्ये वार्षिक क्रीडा संपन्न

बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय मध्ये वार्षिक क्रीडा संपन्न झाल्या. वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन धर्मस्थळ फंडच्या फील्ड सुपरवायझर सुजाता मॅडम व सेवा प्रतिनिधी अश्विनी मॅडम यांच्या हस्ते झाले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून चांगळेश्वरी हायस्कूलचे माजी शारीरिक शिक्षक मधु पाटील हे उपस्थित होते. मधु पाटील यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक व …

Read More »

मातृभाषेमुळे शिक्षणाचा पाया घट्ट : सांबरेकर

बेळगाव : मातृभाषेमुळे मुलांवर संस्कार करणे सोपे होते. त्याशिवाय त्यांच्या शिक्षणाचा पाया घट्ट होतो, असे विचार सामाजिक कार्यकर्ते मारुतीराव सांबरेकर यांनी बाल साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. शहरातील कॅम्प येथील गोगटे रंग मंदिरामध्ये डॉ अनिल अवचट साहित्यनगरी येथे वि. गो. साठे प्रबोधिनीतर्फे आज शनिवारी आयोजित 21 व्या मराठी बाल साहित्य …

Read More »

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने उद्या रविवारी मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

  बेळगाव : बेळगावच्या मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने उद्या रविवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आनंदवाडी च्या कुस्ती आखाड्यात मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे.उद्या रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती नागराज बसीडोनी विरुद्ध संतोष पडोलकर (पुणे) यांच्यामध्ये होणार आहे. त्यानंतर …

Read More »

नियती फाऊंडेशनच्यावतीने आर्ष विद्या केंद्राच्या महिला खेळाडूंना क्रिडा किट भेट

बेळगाव : नियती फाऊंडेशनच्या वतीने आर्ष विद्या केंद्राच्या 12 महिला फुटबॉल खेळाडूंना क्रीडा किट भेट देण्यात आले. अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षण घेत असलेल्या आर्ष विद्या केंद्रातील 12 महिला फुटबॉल खेळाडूना फाऊंडेशनच्यावतीने फुटबॉल शूज व क्रीडा किट भेट देण्यात आले. संत मीरा शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या …

Read More »

पायोनियर बँकेने गाठला ठेवींचा १०० कोटींचा टप्पा

बेळगाव : शहरातील सहकार क्षेत्रातील सर्वात जुनी व सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पायोनियर अर्बन बँकेने नुकताच १०० कोटी रूपयांचा ठेवींचा टप्पा पार केला आहे. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवींचा १०० कोटी रूपयांचा टप्पा पार केल्याबद्दल चेअरमन प्रदीप अष्टेकर यांच्या हस्ते केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी …

Read More »

कुकडोळी गावात खा. इराणा कडाडी यांच्याहस्ते भूमिपूजन

बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने कुकडोळी गाव दत्तक घेण्यात आले आहे. कुकडोळी आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यसभा सदस्य ” इराणा कडाडी यांच्या अनुदानातून दहा लाख रुपये व्यायाम शाळेसाठी मंजूर करण्यात आले आहेत. आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी श्री. …

Read More »

संघ-संस्थांचे फलक आढळून आल्यास वाहन होणार जप्त : परिवहन अधिकारी

बेळगाव : वाहन नोंदणी फलकावर नियमबाह्यपणे कोणत्याही संघ संस्थांचा उल्लेख अथवा चिन्ह आढळून आल्यास अशा वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, शिवाय सदर वाहन जप्त करण्यात येईल असा इशारा बेळगाव परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम यांनी दिला. शुक्रवारी बेळगावमधील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली आहे. वाहन नोंदणी …

Read More »

रोटरीतर्फे रविवारी बृहत पोलिओ लसीकरण मोहिम

बेळगाव : राष्ट्रीय पोलिओ लसीकरण दिनानिमित्त बेळगाव रोटरी परिवार आणि जिल्हा आरोग्य खाते यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी बृहत पोलिओ प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी बेळगाव शहर परिसरात एकूण 174 पोलिओ लसीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सदर मोहिमेअंतर्गत रविवारी एका दिवशी 42000 …

Read More »

प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदारांच्या कवितेच्या समिक्षेला पुरस्कार

बेळगांव : कोल्हापूर येथे प्रसिद्ध कवी प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या “सृजनगंध ” या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेची समिक्षा असलेल्या ग्रंथास नुकताच करवीर साहित्य परिषदेचा संकीर्ण विभागाचा प्रथम क्रमांचा पुरस्कार प्राप्त झाला. रोख रक्कम, प्रमाणपत्र, स्मूर्तीचिन्ह, ग्रंथ भेट, पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरूप असून पुणे येथील आत्मदर्शन संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. …

Read More »

टीजेएसबी बेळगाव शाखेत सुवर्ण महोत्सव साजरा

बेळगाव (प्रतिनिधी) : कॉलेज रोडवरील ठाणे जनता सहकारी बँकेने ५० वर्षांची यशस्वी पूर्ती केली असून ५१ व्या वर्षात दिमाखदार पदार्पण केले आहे. बँकेचा शताब्दीचा महोत्सवही साजरा करावा आणि आम्हालाही बोलवावे. बँकेला आगामी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बँकेच्या शाखेत दि. ५ रोजी हा …

Read More »