Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

नाईट क्लब आणि पब्समधील गैरप्रकारांवर निर्बंध घाला : नगरसेवक शंकर पाटील

बेळगाव : बेळगाव शहरातील नाईट क्लब आणि पब्समध्ये घडत असलेल्या बेकायदेशीर आणि असंबद्ध प्रकारांवर तात्काळ निर्बंध घातले जावेत अशी मागणी करून ही कारवाई 28 फेब्रुवारी पूर्वी न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा प्रभाग क्र. 7 चे नगरसेवक डाॅ. शंकरगौडा बी. पाटील यांनी दिला आहे. नगरसेवक डाॅ. शंकरगौडा पाटील यांनी उपरोक्त मागणीचे …

Read More »

उत्तर मतदारसंघातील विविध विकासकामांचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते उद्घाटन

बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातील विविध विकासकामांना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज चालना दिली. त्यामुळे श्रीनगरमधील शिवालय कंपाऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन कंपाऊंड भींत, महांतेशनगरमधील मुख्य रस्त्याच्या कामासह गजानन गल्ली व दीपक गल्ली येथील विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरात बहुतांश भागात मात्र स्मार्टसिटीची कामे अर्धवट स्थितीत आहेत. …

Read More »

युवा समितीकडून शैक्षणिक साहित्य वाटप

बेळगाव : १९/०२/२०२२ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत अनगोळ येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्र. ०६ मध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रति वर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू विद्यार्थ्याना …

Read More »

जिल्हा इस्पितळ परिसरात मराठी भाषेत फलक लावावेत : म. ए. समितीचे निवेदन सादर

बेळगाव : मराठी भाषिक रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात सर्वत्र मराठी भाषेतदेखील फलक लावण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. भारत सरकारच्या भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांनी भाषिक अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार आणि बेळगावच्या उपायुक्तांना सूचना दिल्या होत्या . उपायुक्तांनी मराठी लोकप्रतिनिधींशी …

Read More »

हिजाब ही ईस्लामची अनिवार्य धार्मिक प्रथा नाही; सरकारचा उच्च न्यायालयात युक्तीवाद

बंगळूर : कर्नाटक सरकारने शुक्रवारी कर्नाटक उच्च न्यायालयासमोर असा युक्तिवाद केला, की हिजाब ही इस्लामची अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही आणि त्याचा वापर प्रतिबंधित केल्याने धार्मिक स्वातंत्र्याची हमी देणाऱ्या भारतीय संविधानाच्या कलम २५ चे उल्लंघन होत नाही. राज्याचे महाधिवक्ता प्रभुलिंग नावदगी यांनी न्यायमूर्ती अवस्थी, न्यायमूर्ती जे. एम. खाझी आणि न्यायमूर्ती कृष्णा …

Read More »

कॉंग्रेसचे आता विधानसभेत ‘दिवस-रात्र’ आंदोलन

ईश्वरप्पांच्या राजीनाम्याची मागणी कायम; विधान परिषदेतही पडसाद बंगळूर : राष्ट्रध्वजाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांची हकालपट्टी करण्यात यावी आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी काँग्रेसची निदर्शनेने गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेत सुरूच राहीली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज आजही ठप्प झाले. त्यामुळे सभाध्यक्षानी …

Read More »

म. ए. समिती सांगली शाखा पदसिद्ध अध्यक्ष दिग्विजय सूर्यवंशी यांचा युवा समितीकडून सत्कार

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका महापौर तसेच मागील काही महिन्यांपूर्वी सीमाभागातील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती तथा म. ए. समिती सांगली शाखा पदसिद्ध अध्यक्ष श्री. दिग्विजय सूर्यवंशी यांचा सांगली भेटीवेळी सत्कार करण्यात आला. डिसेंबर महिण्यात म. ए. समितीच्या वतीने महावेळाव्याचे आयोजन …

Read More »

जिव्हाळा फौंडेशनच्यावतीने विद्यार्थिनींसाठी आरोग्य मार्गदर्शन

बेळगाव : “आरोग्य हीच खरी धनसंपदा” शालेय वयातच मुलांना आरोग्याचे महत्व, आरोग्य विषयक समस्या व उपाय याविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळेत मुलींसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून स्त्रीरोग तज्ञ डॉ. सविता कद्दू, आय.एम.ए. अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ तसेच जिव्हाळा फौंडेशनच्या अध्यक्षा …

Read More »

सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना तडीपार करा

बेळगाव : चित्रदुर्ग पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कर्नाटक कर्मचारी संघ, ग्रामविकास आणि पंचायत तसेच कर्मचारी संघाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. चित्रदुर्ग जिल्ह्यातील चळकेरे तालुक्यातील कार्यकारी अधिकारी मडगीन बसाप्पा यांच्यावर दि. १४ फेब्रुवारी रोजी तालुका पंचायत कार्यालयात काहींनी अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करत हल्ला केला. या दुष्कर्म्यांना …

Read More »

म. ए. युवा समितीच्यावतीने पिरनवाडी येथील मराठी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप

बेळगाव : दि. १५/०२/२०२२ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत पिरनवाडी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रतिवर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू विद्यार्थाना शैक्षणिक साहित्य वाटप …

Read More »