Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

रयत गल्ली येथील धोकादायक ट्रान्सफॉर्मर बदलण्याची मागणी

बेळगाव : रयत गल्ली, वडगाव येथील वरचेवर जळून खराब होणारा विद्युत ट्रान्सफॉर्मर स्थानिकांसाठी धोकादायक ठरत असून हा ट्रान्सफॉर्मर बदलून नवा ट्रान्सफॉर्मर बसवावा अथवा त्याची जागा बदलावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. रयत गल्ली येथे रस्त्याच्या कडेला अनेक वर्षापासून मोठा विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवली आहे. मात्र अलीकडे दुरुस्ती करून सर्व साहित्य …

Read More »

बेळगांवच्या स्नुषेचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

बेळगाव : बेळगांवच्या स्नुषा डॉ. कल्पना सुहास गोडबोले यांना मुंबई येथे राजभवनामध्ये काल शुक्रवारी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते ‘महाराष्ट्राचा कोरोना योद्धा -2021’ हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. शहरातील रविशंकर आर्केड, एसबीजे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजसमोर गणेशपुर रोड येथील सुप्रसिद्ध डॉ. सुहास गोडबोले यांच्या …

Read More »

भालचंद्र जारकीहोळी यांना कॅबिनेट मंत्री पद द्या

चलवादी महासभा आणि दलित पँथर यांच्यावतीने मागणी बेळगाव : जिल्हा चलवादी महासभा आणि दलित पँथर यांच्यावतीने हॉटेल मिलनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून भालचंद्र जारकीहोळी यांना पद द्यावे अशी मागणी केली. तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेहरू उरलेकर यांच्यासह चलवादी समाजाचे अनेक आमदार भाजपात आहेत. …

Read More »

बेळगावात नोटरी वकिलांचा मेळावा

बेळगाव : बेळगावात शनिवारी जिल्ह्यातील नोटरी वकिलांचामेळावा घेण्यात आला. कोरोना महामारीमुळे 2 वर्षानंतर झालेल्या या मेळाव्यात नोटरी वकिलांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. कर्नाटक स्टेट नोटरी असोसिएशन आणि बेळगाव डिस्ट्रिक्ट नोटरी असोसिएशनच्या वतीने बेळगावातील वकील संघटनेच्या समुदाय भवनात शनिवारी जिल्ह्यातील नोटरी वकिलांचा मेळावा घेण्यात आला. राज्य नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष एस. …

Read More »

साजिद शेख यांचा वन खात्यातर्फे सत्कार

बेळगाव : वन्यजीव सप्ताहानिमित्त बेळगाव वन विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जनतेत वन्य प्राण्यांच्या विषयी जागरूकता, छायाचित्र प्रदर्शन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन वन्यजीव सप्ताहात करण्यात आले होते. वन्यजीव सप्ताह समारोपाच्या निमित्त सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि वन खात्याला विविध कार्यात सहकार्य करणार्‍या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. समारोप कार्यक्रमाचे आयोजन महात …

Read More »

ज्योतिर्लिंग व काळभैरव प्रभावळ स्थापना कार्यक्रम भक्तीभावाने

येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री जोतिर्लिंग कमिटीतर्फे आयोजित ज्योतिर्लिंग प्रभावळ व काळभैरव प्रभावळ स्थापना कार्यक्रम भक्तीभावाने मोठ्या उत्साहात पार पडला. सदर ज्योतिर्लिंग प्रभावळ व काळभैरव प्रभावळ स्थापना कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी ज्योतिर्लिंग कमिटीचे अध्यक्ष देवाप्पा खेमणाकर हे होते. प्रारंभी दुदाप्पा बागेवाडी यानी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. प्रभावळ गाड्याचे पुजन ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश …

Read More »

हिरा टॉकीज नजिक 8 जुगार्‍यांना अटक

बेळगाव : हिरा टॉकीज नजिक खुल्या जागेतील जुगारी अड्ड्यावर छापा टाकून आठ जुगार्‍यांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवार (ता. 8) रात्री मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याकडून 85 हजार 890 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मार्केट पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येणार्‍या हिरा टॉकीज नजिक खुल्या जागेत …

Read More »

एकाच दिवसात एक लाख भाविकांनी घेतले श्री रेणुका देवीचे दर्शन गेले

बेळगाव : दीड वर्ष भाविकांना दर्शनासाठी बंद असलेले बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीचे मंदिर 27 सप्टेंबर पासून खुले करण्यात आले. मंदिर खुले करण्यात आल्यानंतर पहिल्याच आठवड्यात एक लाख 58 हजार भाविकांनी श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आता नवरात्र उत्सव काळात श्री रेणुका देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी …

Read More »

श्री कपिलेश्वर मंदिरात कुलस्वामिनी भव्य मूर्तीचे अनावरण

बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये कपिलेश्वर मंदिराची कुलस्वामिनी या मूर्तीचा अनावरण सोहळा संपन्न झाला. बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांच्या हस्ते कुलस्वामिनी मूर्तीचे अनावरण झाले. यावेळी मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांचा सत्कार मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री व सतीश निलजकर यांच्या हस्ते करण्यात आला. …

Read More »

कणबर्गीतील आणखी एका रुग्णालयाला टाळे; आरोग्य खात्याची कारवाई

बेळगाव : गांधीनगर येथील एका नॉन मॅट्रिक तोतया डॉक्टरावर आरोग्य खात्याने कारवाई करून दवाखान्याला टाळे ठोकण्यासह कणबर्गी येथील आणखी एका दवाखान्यावर काल कारवाई केली आहे. श्री सिद्धेश्वर क्लिनिक या नावाने सुरू करण्यात आलेल्या दवाखान्यात रुग्णांना मोठ्या प्रमाणात लोपॅथी औषधे देण्यात येत होती. त्यामुळे आरोग्य खात्याने डॉ. लक्ष्मण मालाई तयांच्याच्या विरोधात …

Read More »