बेळगाव : किणये येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण झाल्यावर पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी थोरराष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेला उपस्थित अनेक …
Read More »LOCAL NEWS
ट्रॅक्टरसाठी घेतलेल्या कर्जफेडीची मुदत वाढवून द्यावी : शेतकऱ्यांची मागणी
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील चंदन होसूर येथील शेतकऱ्यांनी तालुका प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँकेतून ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी ६ महिन्यांची वाढीव मुदत देण्यात यावी, असा आग्रह करण्यात आला आहे. बेळगावमधील महाद्वार रोडजवळील तालुका प्राथमिक सहकारी कृषी ग्रामविकास बँकेसमोर नेगीलयोगी संघाच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले. यासंदर्भात सुरेश …
Read More »बेळगाव जिल्ह्यातील संमेलन संयोजकांना आवाहन
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात 13 ते 14 मराठी साहित्य संमेलन दरवर्षी भरविली जातात. ही संमेलने ग्रामीण भागात होत असतात. बेळगाव शहरातही संमेलन सन 2020 पासून सुरु केले आहे. यावर्षी हे ३ रे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन 8 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे छत्रपती …
Read More »नूतन जिल्हाधिकार्यांचे श्रमिक पत्रकार संघाकडून स्वागत
बेळगाव : बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे शनिवारी सत्कार करून स्वागत करण्यात आले. राज्य सरकारने बेळगावचे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांची बदली केल्यानंतर नितेश पाटील यांनी नवीन जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत. त्यामुळे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव जिल्हा …
Read More »जिल्हा मध्यवर्ती बँक आणि अपेक्स बँकेचे विलीनीकरण होऊ नये : रमेश कत्ती
बेळगाव : केंद्र आणि राज्य सरकारने सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका आणि अपेक्स बँक विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला असून हि प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असं आवाहन बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी केले आहे. हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी गावातील हुल्लोळ्ळी अरिहंत सहकारी संस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. …
Read More »आमदार यत्नाळांच्या ‘त्या’ विधानावर विरोधकांकडून भाजप टार्गेट!
बेळगाव : भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केलेल्या विधानानंतर विरोधकांनी भाजपाला टार्गेट करण्यात सुरुवात केली असून राजकीय वर्तुळात आता पद मिळविण्यासाठी द्याव्या लागणार्या पैशांसंदर्भात उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे. यासंदर्भात बेळगावमध्ये सिद्धरामय्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपण पाच पैसेही न देता मुख्यमंत्री झालो असा टोला हाणलाय. मुख्यमंत्री होण्यासाठी 2500 …
Read More »अनधिकृत इमारती लवकरच होणार नियमित
शहर स्थानिक संस्थात लवकरच अंमलबजावणी बंगळूर : राज्यातील शहरी भागातील अनधिकृत इमारती, अनधिकृत वसाहती आणि नकाशाला मंजूरी न घेता बांधण्यात आलेल्या अनधिकृत इमारती नियमित करण्यासाठी सरकारने गांभिर्याने विचार चालविला आहे. अशा इमारतीना एकाच वेळी दंड आकारून त्या रितसर (सक्रम) करण्याच्या योजनेची काही महिन्यांत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. राज्यभरातील नगर स्थानिक …
Read More »बेळगुंदीच्या इसमाचा राजगोळी येथे बुडून मृत्यू
बेळगाव : राजगोळी (ता. चंदगड) येथील एका विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू झाला आहे. विठ्ठल नागाप्पा पुजारी (वय 40 रा.शिवाजीनगर, बेळगुंदी) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी तो राजगोळी येथे गेला होता. त्यावेळी तो पोहण्यासाठी विहिरीत उतरला असण्याचा अंदाज आहे. मात्र त्यावेळी त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उशिराने उघडकीस आली. या …
Read More »दक्षिण विभाग उपनोंदणी कार्यालयात मोठा भ्रष्टाचार : राजू टोपन्नावर
बेळगाव : बेळगावात नुकतेच सुरु करण्यात आलेल्या बेळगाव दक्षिण विभाग उपनोंदणी कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते राजू टोपन्नावर यांनी केला आहे. बेळगाव येथील साहित्य भवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना आम आदमी पक्षाचे उत्तर कर्नाटक प्रभारी राजू टोपन्नावर म्हणाले, बेळगाव दक्षिण विभाग उपनोंदणी कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. …
Read More »जलद कृती दलाचे बेळगावात पथसंचलन
बेळगाव : जलद कृती दलाच्या वतीने बेळगावात आज संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात पथसंचलन करण्यात आले. कसल्याही प्रकारचा हिंसाचार, दंगल तातडीने थांबवून संबंधित प्रदेशात कायदा व सुव्यवस्था लागू करण्यासाठी रॅपिड ऍक्शन फोर्स अर्थात जलद कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. हे निमलष्करी दल संपूर्ण देशातच अत्यंत शक्तिशाली आणि स्ट्रायकिंग फोर्स म्हणून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta