Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

कार – दुचाकीच्या भीषण अपघातात अथणीत दोघांचा जागीच मृत्यू

  अथणी : अथणी तालुक्यातील सत्ती गावाच्या परिसरात शनिवारी रात्री उशिरा झालेल्या कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सत्ती गावाबाहेर दुचाकी आणि समोरून येणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जोराची होती की …

Read More »

महिला विकास निगमच्या अध्यक्षा पद्मावतींकडून सौंदत्तीत वाणिज्य संकुलाची पाहणी

  बेळगाव :;महिला विकास निगमच्या अध्यक्षा पद्मावती यांनी शुक्रवारी सौंदत्ती येथील यल्लम्मा टेकडीला भेट देऊन, निगमच्या वतीने बांधण्यात आलेल्या वाणिज्य संकुलातील गाळ्यांची पाहणी केली. गाळ्यांच्या वाटपाबद्दल त्यांनी देवस्थान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याच वेळी त्यांनी उद्योजिनी योजनेच्या लाभार्थ्यांच्या युनिट्सला भेट देऊन डी.आर.पी. सर्वेक्षणाची पाहणी केली. त्यानंतर, त्यांनी माजी देवदासी महिलांशी …

Read More »

“भगवा” ध्वज फडकविल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या कन्नड ध्वजावरून निर्माण झालेल्या वादाच्या प्रकरणात, कोनेवाडी येथे भगवा ध्वज फडकवून दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. २१ जानेवारी २०२१ रोजी, बेळगाव महानगरपालिकेच्या मुख्य …

Read More »

अंमली पदार्थ सेवन प्रकरणी तिघांना अटक

  बेळगाव : बेळगाव शहर पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा सपाटा सुरू आहे. दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी टिळकवाडी आणि हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या कारवाईत एकूण तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिळकवाडी पोलीस …

Read More »

बॉक्सिंग, स्केटिंगमध्ये गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलचे विद्यार्थी अव्वल

  बेळगाव : बेळगाव येथील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या बॉक्सिंग आणि स्केटिंगच्या राज्य तसेच विभागीय पातळीवरील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. विविध पदके पटकावून त्यांनी शाळेची कीर्ती वाढवली आहे. अलीकडेच झालेल्या कर्नाटक राज्य चॅम्पियनशिप आणि सीबीएसई दक्षिण विभागीय चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये भूमिकास किरोजी आणि गणेश कांबळे यांनी बॉक्सिंगमध्ये …

Read More »

बेळगावात 8 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन; सभापती बसवराज होरट्टी

  बेळगाव : बेळगाव येथे ८ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन घेण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून, त्यांनी त्याला संमती दिली आहे, अशी माहिती विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी दिली आहे. धारवाड येथे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “आमदारांमध्ये कोणतेही गांभीर्य दिसत नाही. उत्तर कर्नाटकातील आमदार विकासावर बोलत नाहीत, फक्त दक्षिण …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने मराठी व्याकरण व हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने रविवार दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व द. रा. किल्लेकर स्मृती सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा ठीक 9.30 वाजता मराठी विद्यानिकेतन येथे सुरू होतील. या संदर्भातल्या नियोजनाची बैठक आज मराठी विद्यानिकेतन येथे संपन्न …

Read More »

बी. के. मॉडेल हायस्कूलला खासदार इरण्णा कडाडी यांची भेट

  बेळगाव : बी. ई. संस्थेच्या बी. के. मॉडेल हायस्कूलचा शतकमहोत्सव कार्यक्रम दि. 20 पासून ते 23 डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात पूर्वतयारी चर्चा करण्यासाठी राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी शाळेमध्ये उपस्थित होते. प्रारंभी संस्थेच्या वतीने अध्यक्ष अविनाश पोतदार आणि कार्यदर्शी श्रीनिवास शिवनगी यांच्यावतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. …

Read More »

तिसरे गेट उड्डाणपूल रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पोलीस सरसावले

  बेळगाव (प्रतिनिधी) : तिसरे रेल्वे गेट उड्डाणपूलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. यासाठी नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन देखील छेडण्यात आले. त्यावेळी सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आश्वासन देण्यात आले होते. सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा या रस्त्याची अवस्था गंभीर …

Read More »

विजेचा धक्का लागून कंग्राळी खुर्दच्या तरुणाचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बंबरगे गावात पावसादरम्यान विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अमोल विवेकानंद उर्फ लालू जाधव (वय ४३ रा.रामनगर, कंग्राळी खुर्द) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, अमोल जाधव यांचे बंबरगे येथे कुक्कुटपालन केंद्र आहे. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास …

Read More »