Sunday , September 20 2026
Breaking News

बॉक्सिंग, स्केटिंगमध्ये गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलचे विद्यार्थी अव्वल

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या बॉक्सिंग आणि स्केटिंगच्या राज्य तसेच विभागीय पातळीवरील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. विविध पदके पटकावून त्यांनी शाळेची कीर्ती वाढवली आहे.
अलीकडेच झालेल्या कर्नाटक राज्य चॅम्पियनशिप आणि सीबीएसई दक्षिण विभागीय चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये भूमिकास किरोजी आणि गणेश कांबळे यांनी बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदके जिंकली, तर वृतिका कोळूरमठ, इव्हान्जेलीन डिसूझा आणि मोहम्मद नुमान यांनी रौप्य पदके मिळवली. नैतीक भाटी याने कांस्यपदक प्राप्त केले आहे.स्केटिंग विभागात, सौरभ साळुंके याने एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले, तर अनघा जोशी हिने रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे.सध्या, चार बॉक्सर – भूमिकास किरोजी, वृतिका कोळूरमठ, इव्हान्जेलीन डिसूझा आणि मोहम्मद नुमान यांची बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मिनी ऑलिम्पिक चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा ४ नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. स्केटिंगमधील विद्यार्थी चंदीगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक सत्येंद्र त्रिपाठी (बॉक्सिंग) आणि सूर्यकांत हिंडलगेकर (स्केटिंग) यांनी मार्गदर्शन केले आहे.

संस्थेचे अध्यक्ष राज घाटगे, एसबीजी आयुर्वेद कॉलेजचे अध्यक्ष अमित घाटगे, व्यवस्थापकीय संचालिका प्रेरणा घाटगे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका प्रचिती आंबेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *