Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

धर्मनाथ सर्कल नेहरूनगर परिसरात खाजगी ट्रॅव्हल्स वाहनांचे चक्क पदपथावर अतिक्रमण…

  बेळगाव : धर्मनाथ सर्कल नेहरूनगर परिसरात खाजगी ट्रॅव्हल्स वाहनांनी चक्क पदपथावर अतिक्रमण केल्याचे पहावयास मिळत आहे. धर्मनाथ सर्कल येथे पुणे-मुंबई-बेंगलोर या ठिकाणी प्रवास करणाऱ्या खाजगी गाड्या असतात. या गाड्या रात्रीचा प्रवास करतात आणि दिवसभर पदपथावर उभ्या केल्या जातात. त्यामुळे पादचार्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे या प्रकाराकडे …

Read More »

जायंट्स ग्रुप बेळगांव परिवारतर्फे परिचारिका दिनाचे निमित्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

  बेळगाव : जायंट्स ग्रुप बेळगांव परिवारतर्फे १२ मे परिचारिका दिनाचे निमित्त साधून मलप्रभा हॉस्पिटल डबल रोड खासबाग मधील परिचारिका कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मलप्रभा हॉस्पिटलचे डॉक्टर महांतेश वाली, डॉक्टर दीपा वाली हे उपस्थित होते यांनी परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ५ कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह, पुष्पगुच्छ, आणि …

Read More »

नीट घोटाळाप्रकरणी बेळगावातील एकासह पाच जण गुजरात पोलिसांच्या ताब्यात

  बेळगाव : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी महत्वपूर्ण असलेल्या नीट घोटाळाप्रकरणी गुजरातमधील राजकोट पोलिसांनी बेळगावातील एका इंटरनॅशनल स्कूलचे चालक असलेल्या मनजीत जैन यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. राजकोटमधील गुन्हे अन्वेषण विभागाने नीटमध्ये गुण वाढवून देणाऱ्या टोळीचा शुक्रवारी (दि. ९) रोजी पर्दाफाश केला. त्यात शिक्षण सल्लागार विपुल तेरैया, राजकोटमधील रॉयल अकॅडमी …

Read More »

बेळगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस; केएलईजवळ होर्डिंग कोसळले!

बेळगाव : बेळगाव शहर परिसरात आज सायंकाळपासून अचानक आलेल्या जोरदार वळिवाच्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील नेहरू नगर परिसरातील केएलई हॉस्पिटलच्या बाजूला असलेले एक मोठे जाहिरात होर्डिंग वाऱ्याच्या वेगामुळे कोसळले. सकाळपासूनच बेळगावात ढगाळ वातावरण होते आणि सायंकाळच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. …

Read More »

एपीएमसी पोलिस स्थानकात वकिलाला मारहाण; कारवाईसाठी वकील संघटनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

  बेळगाव : ॲड. श्रीधर कुलकर्णी हे त्यांच्या एका अशीलासोबत कोर्टाच्या आदेशानुसार, सरफेसी कायद्यांतर्गत पोलीस संरक्षणाची मागणी करण्यासाठी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. त्यावेळी स्टेशन हाऊस ऑफिसर सुनगार यांनी कुलकर्णी यांच्या मागणीला कोणताही प्रतिसाद न देता उलट त्यांना अपमानित केले असा आरोप वकिलांनी केला आहे. इतकेच नव्हे, तर सुनगार यांनी …

Read More »

हलगाजवळ आंब्याने भरलेला कंटेनर पलटली…

  बेळगाव : हुबळी हानगल येथून मुंबई मार्केटकडे जात असलेले कंटेनर स्लीपर बसला चुकवण्याच्या नादात चालकाने कंटेनर गाडी दुभाजकाच्या बाजूने घेतल्यामुळे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालेला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही जर कंटेनर स्लीपर बसला जाऊन आढळली असती तर मोठा अनर्थ घडला असता. कंटेनर गाडीच्या चालकाने …

Read More »

संतिबस्तवाड कुराण जाळल्याप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास : पालकमंत्री सतीश जारकीहोळी

    बेळगाव : बेळगाव तालुक्यातील संतिबस्तवाड गावात मशिदीतील कुराण जाळल्याच्या घटनेची पोलिसानी आधीच स्वतःहून गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. सुवर्ण विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, संतिबस्तवाड गावात कुराण जाळल्याच्या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. जिल्ह्यात अनेक धार्मिक …

Read More »

हडपलेली 13 एकर शेती शेतकऱ्याला परत!

  डीसींच्या कोर्टात गरीब शेतकर्‍यांना न्याय; अथणी तालुक्यातील मदभावी येथील प्रकरण बेळगाव : तांत्रिक कारणांचा आधार घेत कागदपत्रांमध्ये फेरफार करत तब्बल 13 एकर 8 गुंठे शेतजमीन तिघा भावांनी स्वतःच्या नावावर करून घेतली. परंतु, सलग दोन वर्षे न्यायालयीन लढा देत जक्करहट्टी (ता. अथणी) येथील बजबळे कुटुंबियाने आपली शेतजमीन परत मिळवली. जिल्हाधिकार्‍यांच्या …

Read More »

आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या विनोद मेत्री व राजेश लोहार यांचे उद्या जंगी स्वागत…

  बेळगाव : थायलंड पटाया येथे नुकत्याच झालेल्या जागतिक पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगांवचा उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू विनोद पुंडलिक मेत्री याने सुवर्णपदक व आंतरराष्ट्रीय पंच म्हणून उत्तीर्ण झालेल्या राजेश लोहार यांचे धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्या समोर बुधवार ता 14 मे रोजी सकाळी 11.00 जंगी स्वागत करण्यात येणार आहे, विनोदने भारताचे प्रतिनिधित्व करीत …

Read More »

बेळगावात कॅन्सर हॉस्पिटल उभारणीसाठी हालचाल

  केडीपी बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासाठी मंजूर असलेले सरकारी कॅन्सर हॉस्पिटल चिक्कोडी ऐवजी बेळगावात उभारणीसाठीबाबत आज केडीपी बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलच्या बांधकामासाठी योग्य जागा शोधण्याकरिता १० दिवसांचा अवधी मागितला आहे. बेळगाव जिल्हापालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली आज केडीपीची बैठक …

Read More »