बेळगाव : बेळगाव शहर परिसरात आज सायंकाळपासून अचानक आलेल्या जोरदार वळिवाच्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील नेहरू नगर परिसरातील केएलई हॉस्पिटलच्या बाजूला असलेले एक मोठे जाहिरात होर्डिंग वाऱ्याच्या वेगामुळे कोसळले.
सकाळपासूनच बेळगावात ढगाळ वातावरण होते आणि सायंकाळच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. नेहरू नगरमध्ये केएलई हॉस्पिटलच्या जवळ असलेले एक मोठे होर्डिंग जोरदार वाऱ्यामुळे फुटपाथवर पडले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु फुटपाथवर पडलेल्या होर्डिंगमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
