बेळगाव : जायंट्स ग्रुप बेळगांव परिवारतर्फे १२ मे परिचारिका दिनाचे निमित्त साधून मलप्रभा हॉस्पिटल डबल रोड खासबाग मधील परिचारिका कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला मलप्रभा हॉस्पिटलचे डॉक्टर महांतेश वाली, डॉक्टर दीपा वाली हे उपस्थित होते यांनी परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी ५ कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह, पुष्पगुच्छ, आणि भेटवस्तू देऊन सत्कार सत्कारमूर्तींच्या वतीने करुणा कांबळे यांनी सत्कार केल्याबद्दल जायंट्स ग्रुपचे आभार व्यक्त केले.
अध्यक्ष सचिन केळवेकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. यावेळी जायंट्स वेलफेअर फाऊंडेशनचे सचिव प्रवीण त्रिवेदी, जायंट्सचे उपाध्यक्ष तानाजी शिंदे, सदस्य अभिषेक वाईंगडे, राजू आष्टेकर उपस्थित होते. तानाजी शिंदे यांनी आभार म्हणाले.