बेळगाव : बेळगावातील आणि शहापूरमधील श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. गेल्या अनेक वर्षापासून ही रथोत्सवाची परंपरा सुरू आहे. बेळगावातील श्री लक्ष्मी वेंकटेश मंदिराच्या रथोत्सवात शेकडो भाविक रथ ओढण्यासाठी सहभागी झाले होते. व्यंकट रमण गोविंदाचा गजर रथ ओढताना भक्त करत होते. शहरातील प्रमुख मार्गावर फिरून मंदिराकडे …
Read More »LOCAL NEWS
विश्वविख्यात म्हैसूर दसरा महोत्सवाची आज जंबो सवारीने सांगता
बंगळूर : जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सवाच्या नेत्रदीपक जंबोसावरी मिरवणुकीला आज (१२ ऑगस्ट) सुरुवात होणार आहे. ऐतिहासिक विजयादशमीच्या मुहूर्तावर काढण्यात येणारी जंबो सवारीच्या मिरवणुकीचा शुभारंभ म्हैसूर पॅलेसच्या आवारात सुवर्ण अंबरीत सर्वांलंकार परिधान करून विराजमान झालेल्या श्रीचामुंडेश्वरी देवीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात येईल. शनिवारी दुपारी ४ ते ४-३० दरम्यान मुख्यमंत्री …
Read More »आयटी कंपन्यानाही लाल-पिवळा फडकावण्याची सक्ती
बंगळूर : यावर्षी १ नोव्हेंबर रोजी ५० वा कन्नड राज्योत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सर्व शाळा, महाविद्यालये, कारखाने आणि आयटीबीटी कार्यालयांमध्ये लाल-पिवळा (कन्नड) ध्वज अनिवार्यपणे फडकवण्याचे आदेश दिले आहेत. बंगळुरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, एक नोव्हेंबर हा कर्नाटकसाठी महत्त्वाचा आहे. …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीस मध्यवर्ती घटक समितीच्या सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. दीपक दळवी व …
Read More »अनुष्का आपटेला महाराष्ट्र राज्य (संगीत) नाट्य स्पर्धेत रौप्य पदक
बेळगाव : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा समारंभ दिनांक 9/10/2024 रोजी मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात पार पडला. या समारंभाला सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर आणि सदा सरवणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बेळगावची कन्या अनुष्का आपटे हिने “सं. लावणी भुलली अभंगाला” या भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे …
Read More »उचगाव मराठी साहित्य संमेलन १२ जानेवारी रोजी
बेळगाव : उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित २३ वे उचगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी भरविण्याचा निर्णय अकादमीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर हे होते. यावर्षी दिग्गज अशा साहित्यिकांच्या उपस्थितीमध्ये हे संमेलन साजरे करण्यात येणार आहे. यावेळी बैठकीमध्ये इतर साधक, बाधक …
Read More »श्री दुर्गा माता दौडीतून नारीचा शक्तीचा संदेश!
बेळगाव : देव देश आणि धर्म जागृतीचा संदेश देत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे बेळगावात अखंड श्री दुर्गा मातादौडचे २६ वे वर्ष पार पडले. आज ९ व्या दिवशी श्री दुर्गा माता दौडीला बेळगाव शहरातील ताशिलदार गल्ली, श्री सोमनाथ मंदिर येथून श्री सिद्धिदात्रीच्या पूजेसह प्रदक्षिणा घालण्यात आली. श्री दुर्गामाता दौड …
Read More »कडोली साहित्य संमेलन ५ जानेवारीला
कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे होणारे ४० वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. ५ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. साहित्य संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष भरमाणी डोंगरे होते. बैठकीत 40 व्या संमेलनाच्या आयोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. संमेलनातील विविध सत्रे, साहित्यिक, पाहूणे …
Read More »प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपींना अटक : सात लाखाचे दागिने जप्त
बेळगांव : प्रवाशांना लुटून सोने पळविणाऱ्या आरोपींना अटक करण्यात मार्केट पोलिसांना यश आले आहे. मार्केट पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार रिजवान सिराज पठाण (वय ४०, विद्यानगर, एपीएमसी, बेळगाव), मलिकजान दस्तगीरसाब शेख (वय २६, मूळचा गोकाक सध्या राहणार एपीएमसी) आणि विनायक अरुण हिंडलगेकर (वय ३२, सध्या राहणार जुने गांधीनगर) …
Read More »रेणुकास्वामी हत्या प्रकरण : दर्शनच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; १४ ला निकाल
बंगळूर : चित्रदुर्गातील रेणुकास्वामी खून प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता दर्शनच्या जामीन अर्जावर न्यायालयाने गुरुवारी सुनावणी पूर्ण केली आणि १४ ऑक्टोबरपर्यंत निकाल राखून ठेवला. ५७ व्या सीसी न्यायालयाने दर्शनने दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी केली आणि आरोपीचे वकील सी. व्ही. नागेश आणि एसपीपी प्रसन्न कुमार यांचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय …
Read More »