Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

श्री समादेवी जन्मोत्सव सोहळा- श्री देवीदरबाराला उत्साहात प्रारंभ

  बेळगाव : वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ आणि श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळाला शनिवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने प्रारंभ झाला. शनिवारी सकाळी प्रमुख पाहुण्या सनातन संस्थेच्या सौ. अर्चना घनवट यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर …

Read More »

कर्नाटक प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीसपदी राहुल जारकीहोळी

  बेळगाव : गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या कर्नाटक प्रदेश युवक काँग्रेस समिती निवडणुकीचा निकाल लागला असून सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे पुत्र राहुल जारकीहोळी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत राहुल जारकीहोळी यांनी १ लाख २० हजार मतांच्या फरकाने विजयी झाले असून कर्नाटक प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीसपदी विराजमान …

Read More »

पोक्सो प्रकरणी येडियुरप्पा यांना अटकपूर्व जामीन

  खटला रद्द करण्यास नकार बंगळूर : माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरुद्धचा पोक्सो खटला रद्द करण्यास नकार देणाऱ्या राज्य उच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मुडा प्रकरणातील सीबीआय चौकशीबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर लगेचच माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पोक्सो प्रकरणात तात्पुरता दिलासा मिळाला आहे. अल्पवयीन …

Read More »

मुडा घोटाळा : सीबीआय चौकशीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा दिलासा

  बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) च्या जागेच्या कथित बेकायदेशीर वाटपाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका राज्याच्या उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राज्य उच्च न्यायालयाने मुडा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास नकार दिल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय, मुख्यमंत्री सिद्धरामय्या सीबीआय चौकशीच्या धक्क्यातून …

Read More »

चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांचा रविवारी नागरी सन्मान

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा आघाडी यांच्यावतीने चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार असून यासाठी हुतात्मा स्मारक येथे सत्कार समारंभाची तयारी सुरू करण्यात आली आहे. …

Read More »

कडोलीत विविध स्पर्धांचे आयोजन

  कडोली : येथील मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे रविवार ता. 16 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता वक्तृत्व, निबंध लेखन व सुंदर हस्ताक्षर या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवाजी हायस्कुल, कडोली येथे या स्पर्धा होतील. प्राथमिक (पहिली ते सातवी) आणि माध्यमिक (आठवी …

Read More »

खाजगी वैद्यकीय प्रतिष्ठान कायद्यासंदर्भात भारत असोसिएट्स संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

  बेळगाव : बेळगाव शहरातील रुग्णांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कर्नाटक खाजगी वैद्यकीय प्रतिष्ठान कायदा 2007 या कायद्याची अंमलबजावणी व्हावी. याकरिता नियुक्त बेळगाव जिल्हा नोंदणीकरण आणि तक्रार निवारण समिती कार्यान्वित केली जावी, अशी मागणी अभिजन भारत असोसिएट्स या संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी अभिजन भारत …

Read More »

जोगनभावीचा परिसर पाहून जिल्हाधिकारी झाले हैराण

  सौंदत्ती : बुधवार दिनांक 12 रोजी सौंदत्ती येथील रेणुका देवीची भरत पौर्णिमा यात्रा संपन्न होत आहे. या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भावीक डोंगराकडे निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज शुक्रवारी सकाळी जोगणभावी परिसराची पाहणी केली असता, तेथील बकाल परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हैराण झाले. त्यांनी तेथील …

Read More »

बेळगाव पुन्हा हादरले : महाकुंभमेळ्याहून परतताना भीषण अपघात; 4 ठार

  बेळगाव : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याहून परतताना बेळगावातील चार जणांसह शुक्रवारी सकाळी मध्य प्रदेशातील इंदूरजवळ झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा बेळगाव शहर हळहळले आहे. आता पुन्हा या दुर्दैवी अपघाताने चार बळी घेतल्यामुळे अवघ्या शहरावर शोककळा पसरली आहे. या अपघातात इंदूर येथील स्थानिक असणाऱ्या आणखी …

Read More »

क्रीडा भारती बेळगाव व पतंजली योग समिती यांच्यातर्फे सूर्यनमस्काराचा कार्यक्रम संपन्न

  बेळगाव : जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही क्रीडा भारती व पतंजली योग समिती यांच्या विद्यमाने सूर्यनमस्काराचे आयोजन बालिका आदर्श शाळेच्या मैदानावर सकाळी साडेसहा वाजता करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रोफेसर आनंद गाडगीळ हे होते. यावेळी व्यासपीठावर क्रीडा भारतीचे कर्नाटक राज्य सचिव श्री. अशोक शिंत्रे, ऍड. सुधीर …

Read More »