Tuesday , September 17 2024
Breaking News

LOCAL NEWS

एम. टी. पाटील यांना विविध संस्थातर्फे शोकसभेत श्रद्धांजली

  बेळगाव : बेळगावातील शिक्षण व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत एम. टी. पाटील यांना शनिवारी झालेल्या शोकसभेत विविध संस्थांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाटील यांनी विविध क्षेत्रात निष्ठेने भरीव कार्य केले आहे. त्यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे यावेळी केलेल्या शोकप्रस्तावात म्हटले आहे. आदर्श को- ऑप. …

Read More »

बस आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

  गदग : गदग जिल्ह्यातील नरगुंद तालुक्यातील कोन्नूर येथे परिवहन मंडळाची बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात हावेरी येथील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. रुद्रप्पा अंगडी (55), पत्नी राजेश्वरी (45), मुलगी ऐश्वर्या (16) आणि मुलगा विजय (12) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब कल्लापुर बसवेश्वर …

Read More »

इस्कॉनमध्ये उद्यापासून विविध कार्यक्रम

  बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत् संघ (इस्कॉन) च्या वतीने जन्माष्टमीच्या निमित्ताने 19 ते 27 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 19 ला बलराम जयंती 19 ऑगस्ट रोजी इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलांनंद मंदिरात श्री बलराम जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

Read More »

नौगोबा (रेणुका देवी) यात्रेच्या जागेसंदर्भात अनिल बेनके यांनी घेतली ब्रिगेडीयर जोयदीप मुखर्जी यांची भेट

  बेळगाव : नौगोबा यात्रेच्या (रेणुका देवी यात्रा) जागेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी भाजपा राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी ब्रिगेडीयर जोयदीप मुखर्जी यांची शुक्रवार दि. 16 रोजी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी अनिल बेनके म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून येथे नौगोबा यात्रेच्या (रेणुका देवी गदगा) जत्रा उत्सवासाठी …

Read More »

कोलकाता येथील “त्या” घटनेच्या निषेधार्थ बेळगावातील डॉक्टर रस्त्यावर!

  बेळगाव : कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ आज बेळगावात पुकारण्यात आलेल्या डॉक्टरांच्या देशव्यापी “24 तास काम बंद” आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयएमए बेळगाव, डेंटल असोसिएशन, आयुष संघटना, अभाविप वगैरे विविध संघटनांनी सकाळी शहरात निषेध मोर्चा काढून निवेदन सादर केले. आजच्या या मोर्चात शेकडो …

Read More »

भोई गल्ली घरफोडी प्रकरणी एकाला अटक

  बेळगाव : बेळगाव शहरात चोरट्यानी उच्छाद मांडला आहे. शहरात असलेल्या भोई गल्लीत गुरुवारी रात्री 1.45 च्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी चोरी केली. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यावरून पोलिसांनी एकाला अटक केली असून पुढील तपास करत आहेत. शहरात वाढत …

Read More »

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शेखर तळवार यांच्याकडून विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

  बेळगाव : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सौ. व श्री. लक्ष्मीबाई जयवंत कोंडुस्कर प्रतिष्ठान यांच्या वतीने शहापूर नार्वेकर गल्ली सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 45 येथील विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. तसेच खासबाग जोशी मळा येथील मराठी शाळा क्रमांक 15 येथील विद्यार्थ्यांना भागातील शिक्षणप्रेमी, समाजसेवक शेखर तळवार यांच्याकडून …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्यावतीने रक्तदान शिबिर

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभ दिनी महावीर भवन, हिंदवाडी, बेळगाव येथे जितो बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मेघा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मेगा रक्तदान शिबिरात बेळगावातील अनेक संस्था या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. डॉ. महादेव दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती. …

Read More »

कोलकाता येथे घडलेल्या अमानुष घटनेचा भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्याकडून निषेध

  बेळगाव : कोलकाता येथे घडलेल्या अमानुष घटनेचा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव आणि भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. आज दि. 17 ऑगस्ट रोजी देशभरात होणाऱ्या शांततापूर्ण निदर्शनाला त्यांनी आपला पाठिंबा व्यक्त करून घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहनही डॉ. सरनोबत यांनी …

Read More »

लक्ष्मी रोड भारतनगर शहापूर श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नूतन कार्यकारणी जाहीर

  बेळगाव : नुकतीच श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लक्ष्मी रोड, भारतनगर शहापूर बेळगाव यांची वार्षिक बैठक श्री महागणपती मंदिर येथे संपन्न झाली. या बैठकीत मागील वर्षाचा जमाखर्च आणि नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सर्वानुमते अध्यक्षपदी श्री. सचिन शांताराम केळवेकर यांची तर उपाध्यक्षपदी दीपक अशोक सावळेकर यांची निवड झाली. सचिवपदी संदीप …

Read More »