Monday , September 21 2026
Breaking News

होसुर येथील युवकावरील हल्ल्याप्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

 

बेळगाव : होसुर मठ गल्ली परिसरातील एका युवकावर शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून सागर पांडुरंग सालगुडे (वय 37, रा. होसुर बसवण गल्ली, शहापूर, बेळगाव) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक व्यवहाराच्या वादातून प्रसाद जाधव याच्यावर सागर पांडुरंग सालगुडे याने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. अशी तक्रार जखमीच्या पत्नीने शहापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.

या प्रकरणी शहापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. 114/2025, कलम 109(1), 352 बीएनएस-2023 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची रचना करून आरोपीचा शोध घेण्यात आला व आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *