Friday , April 17 2026
Breaking News

प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन ८ फेब्रुवारी रोजी

Spread the love

 

बेळगांव : येथील प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.
‘प्रगतिशील ‘च्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी ही माहिती दिली. खानापूर रोड, (रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ) येथील श्री तुकाराम महाराज सामाजिक व सांस्कृतिक भवन येथे हे संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्षांची निवड लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विविध चार सत्रात परिसंवाद, विशेष व्याख्यान व कवी संमेलन होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आजवरची संमेलने महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, आचार्य अत्रे व साने गुरुजी यांचे विचार व कार्य या मध्यवर्ती संकल्पनेवर झाली आहेत.

About Belgaum Varta

Check Also

वडगाव विभागातील पारंपरिक श्री शिवजयंती भव्य मिरवणूक सोमवारी

Spread the love  पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्याशी मिरवणूकी संदर्भात चर्चा बेळगाव : वडगाव परिसरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *