Monday , June 1 2026
Breaking News

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध; राजू पोवार यांचे प्रतिपादन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : भारत देश हा कृषिप्रधान असून शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी शासनाने विविध अनुदान आणि सवलती दिल्या पाहिजेत. शेतकरी स्वाभिमानाने जगला पाहिजे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आपण सातत्याने प्रयत्न केले आहेत. यापुढेही त्यांची प्रगती होण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणार असल्याचे प्रतिपादन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले.
यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रति टन ३ हजार ३०० रुपये दर मिळवून दिल्याबद्दल सुळगाव (ता. निपाणी) येथे राजू पोवार यांची वाजत गाजत जंगी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विठ्ठल मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
येथून पुढच्या काळामध्ये सर्व गावांनी एकत्र यावे व येत्या अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सोयी सुविधा प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करुया असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी अनिल सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तत्पूर्वी झाडाला पाणी घालून व ऊस पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
आंदोलन छेडून ३३०० रुपये दर मिळवून दिल्याबद्दल राजू पोवार यांचा सुळगाव ग्रामस्थांतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रयत संघटनेचे निपाणी शहर उपाध्यक्ष सर्जेराव हेगडे, बबन जामदार, नितीन कानडे, सागर पाटील, आनंदा गायकवाड, एस.पी. पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुनिल पाटील, रमेश कोळी, सचिन कांबळे, बाबासो पाटील, ईश्वर कुंभार, भिकाजी कांबळे, दयानंद पाटील, सदाशिव पोवार, राजू पाटील, सूर्यकांत पोवार, दीपक कांबळे, मारुती पोवार, मल्लेश कांबळे, बाळासो पोवार, प्रदीप माने, संदीप लोहार, चतुर माने, बाबासो मगदूम, आप्पासो शेळके, अशोक पाटील, पांडुरंग मगदूम, प्रितम पोवार, महादेव शिरोळे, सुरेश माने, सागर हावले, महादेव शेळके यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भिकाजी कांबळे यांनी सूत्रसंचलन केले तर संजय पोवार यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव नाक्यावरील जलवाहिनीला दुरुस्तीनंतरही गळत

Spread the love  शहर विस्तारले पण पाणी प्रश्न सुटेना निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विस्तार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *