Tuesday , December 9 2025
Breaking News

करवेच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती घेणार पोलिस आयुक्तांची भेट!

Spread the love

 

बेळगाव : महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने कन्नड सक्ती तीव्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुकाने तसेच व्यवसायिक आस्थापनांवरील फलकांवरून कन्नड संघटना भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारी आदेशानुसार व्यवसायिक फलकांवर 60% कन्नड भाषा व 40% इतर भाषेत मजकूर लिहावा असा आदेश असताना देखील कन्नड संघटना पोलीस संरक्षणात बेळगाव शहरातील व्यापाऱ्यांना नाहक त्रास देत आहेत. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कन्नड संघटनांविरोधात निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी समिती कार्यकर्ते आणि मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाने कन्नड संघटनांना वेळीच आवरावे अन्यथा मराठी भाषिक जशास तसे उत्तर देतील असा कडक इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत देण्यात आला आहे. कन्नड संघटनांकडून जाणीवपूर्वक शहर आणि परिसरातील व्यापारी वर्गाला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कन्नड संघटना मराठी भाषिकांवर दडपशाही करीत असून पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहे त्यामुळे संतप्त मराठी भाषिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, कन्नड संघटनांना प्रशासनाने वेळीच रोखावे अन्यथा मराठी भाषिक रस्त्यावर उतरून आपला मराठी बाणा दाखवतील. सरकारी नियमानुसार तीन भाषेतून फलक लावता येतात तरी देखील केवळ कन्नड भाषेचा फलक लावण्याची शक्ती काही कन्नड संघटनांकडून केली जात आहे. यामुळे व्यापारी वर्गाची गळचेपी होत आहे. कन्नड संघटनांची ही अरेरावी रोखण्यासाठी व्यापारी वर्गाची एक बैठक बोलवण्यात यावी आणि या कन्नड संघटना तसेच प्रशासनावर अवमान याचिका दाखल करण्यात यावी असे मत समिती कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कन्नड सक्ती रोखावी अन्यथा मराठी भाषिक स्वस्त बसणार नाही, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात येणार आहे. निवेदन देण्यासाठी समिती कार्यकर्त्यांनी मराठी भाषिकांनी व व्यापारी वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

वनमंत्री ईश्वर खांड्रे यांची बेळगाव प्राणीसंग्रहालयातील काळवीट विभागाला भेट

Spread the love  बेळगाव : भुतरामनहट्टी येथील कित्तुर राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयाला वनमंत्री ईश्वर बी खांड्रे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *