Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

बेळगावमध्ये ‘हम दो हमारे बारा’ चित्रपटाविरोधात निदर्शने

  बेळगाव : मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा ‘हम दो हमारे बारा’ हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत आज बेळगावमधील एसडीपीआय संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. राणी कित्तूर चन्नम्मा चौकात मुस्लिम समाजातील विविध संघटनांच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले होते. ७ जून रोजी ‘हम दो हमारे …

Read More »

तारांगण व फॅशन ट्रेंड्सतर्फे कलाविष्कार कार्यक्रमाचे आयोजन

  सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान बेळगाव : महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या तारांगण व फॅशनच्या दुनियेतील नावलौकिक फॅशन ट्रेंड्स या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने कलाविष्कार हा फॅशन शो व व महिलांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम रविवार दिनांक २ जून दुपारी २ ते ७ यावेळेत खानापूर रोडवरील महावीर भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आला …

Read More »

चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळेचे आवार गजबजले!

  बेळगाव : उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजले आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी खाऊ वाटप करून आकर्षक पद्धतीने शाळा सजवून शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला. दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज शाळांमध्ये किलबिलाट सुरु झाला. …

Read More »

जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाम परिवारातर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिनाबद्दल जनजागृती

  बेळगाव : जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाम परिवारातर्फे आज 31मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाबद्दल देशमुख रोड टिळकवाडी येथील चव्हाण डेअरी येथे कार्यक्रम करण्यात आला आणि शहरात  जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी फेडरेशनचे अध्यक्ष राजू माळवदे यांनी केले. उपाध्यक्ष सचिन केळवेकर यांनी तंबाखू सेवन केल्याने होणाऱ्या आजाराची आणि त्यानंतर …

Read More »

दिग्गु-बाळूची यारी खड्ड्यात गेली दुनियादारी….

  शहरातील बहुचर्चित अशा “त्या” बँकेच्या अध्यक्षाचा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची यादी संपता संपत नाही. “बेळगाव वार्ता”ने सातत्याने “त्या” बँकेचे गैरव्यवहार उघड केले असले तरी एक म्हण आहे “निर्लज्जम सदासुखी” या म्हणीला न्याय देण्याचे काम बँकेचा अध्यक्ष दिग्गुभाई आणि त्याचा पार्टनर बाळू यांनी केले आहे. “बेळगाव वार्ता”च्या हाती आलेल्या माहितीनुसार “त्या” …

Read More »

येळ्ळूर शिवसेना चौक येथील कोसळलेल्या गटारीकडे ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष…

  बेळगाव : 5 महिन्यात 3 वेळा निवेदन देऊन सुद्धा केवळ आश्वासन ऐकायला मिळतं आहेत. त्यामुळे येळ्ळूर येथील नागरिकांतून तीव्र संताप दिसून येत आहे. शिवसेना चौक मेन रोडची गटार फार जुनी असून ती कोसळलेली आहे. ग्राम पंचायतीला ती गटार स्वच्छ करून पूर्ण बांधून द्यावी अशी मागणी करून 3 वेळा निवेदन …

Read More »

अपहरण प्रकरणी भवानी रेवण्णा यांना एसआयटीची नोटीस

  बंगळुरू : केआर नगर महिला अपहरण प्रकरणात आमदार एच. डी. रेवण्णा यांच्या पत्नी भवानी रेवण्णा अडचणीत सापडल्या असून एसआयटीने त्यांना सुनावणीला उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. एसआयटीने यापूर्वी भवानी रेवण्णा यांना दोनदा नोटीस बजावली होती. अटकेचा सामना करत असलेल्या भवानी रेवण्णा यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. भवानी …

Read More »

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : कर्नाटकात ४८ तासांत मान्सून दाखल होणार

  बंगळुरू : येत्या ४८ तासांत कर्नाटकात मान्सून दाखल होणार आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाची अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा मान्सूनचा पाऊस चांगला होणार असल्याची दिलासादायक बातमी मिळाल्याचे हवामान खात्याने सांगितले. येत्या ४८ तासांत मान्सून कर्नाटकात दाखल होणार आहे. राज्यात 2 जूनपासून …

Read More »

प्रज्वल रेवण्णाला बंगळुरू विमानतळावरून अटक

  बंगळुरू : सेक्स टेप प्रकरणात जर्मनीत पळून गेलेल्या प्रज्वलरेवण्णाला अखेल पोलिसांनी अटक केली आहे. बंगळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला कर्नाटक पोलिसांनी अटक केली. गुरुवारी दुपारी इंटरोपलकडून त्याच्या आगमनाची माहिती मिळाल्यानंतर कर्नाटक पोलिसांचे विशेष तपास पथक बंगळुरू पोलीस आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी विमानतळावरच त्याला अटक करण्यासाठी रणनीती आखली होती. त्यानुसार, एसआयटीने …

Read More »

मंत्री नागेंद्र यांच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव

  भाजपची आठवड्याची मुदत; उग्र आंदोलनाचा इशारा बंगळूर : क्रीडा व युवा सक्षमीकरण अनुसूचित जमाती कल्याण मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याच्या मागण्या वाढल्या असून भाजपने मंत्री नागेंद्र यांच्या राजीनाम्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. त्यांनी राजीनामा न दिल्यास राज्यव्यापी संघर्षाचा इशाराही दिला आहे. मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी करत …

Read More »