Friday , September 13 2024
Breaking News

तारांगण व फॅशन ट्रेंड्सतर्फे कलाविष्कार कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

 

सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान

बेळगाव : महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या तारांगण व फॅशनच्या दुनियेतील नावलौकिक फॅशन ट्रेंड्स या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने कलाविष्कार हा फॅशन शो व व महिलांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम रविवार दिनांक २ जून दुपारी २ ते ७ यावेळेत खानापूर रोडवरील महावीर भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. फॅशन डिझायनिंग या क्षेत्रामध्ये नवोदितांना आपली कला सादर करण्याची संधी या कार्यक्रमांमध्ये देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये नवोदित फॅशन डिझायरनी तयार केलेले पोशाखचा फॅशन शो होणार आहे. फॅशन शो सोबतच महिलांचे डान्स, गायन, वादन, गेम शो चे आयोजन केले आहे.
तसेच या कार्यक्रमात समाजासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाणार आहे. बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील व कडक उन्हामध्ये बेळगावकर जनतेला पाणीपुरवठा करणारे सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांचा सन्मान केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दडपण चित्रपटातील प्रमुख भूमिका करणारे शशिकांत नाईक, स्केटिंग कोच सूर्यकांत हिंडलगेकर, महावीर भवन चे विश्वस्त राम कस्तुरे, रमेश चिवटे, विजय खटावकर, विश्वास मानकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे फॅशन ट्रेंड्सच्या संचालिका स्वाती खटावकर यांनी केले आहे. हा कार्यक्रम सर्व महिलांसाठी मोफत व खुला आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री मळेकरणी सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने रविवारी पुरस्कार वितरण सोहळा!

Spread the love  बेळगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि. उचगाव या सोसायटीच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *