Tuesday , April 7 2026
Breaking News

LOCAL NEWS

ज्येष्ठ पत्रकार मनोहर कालकुंद्रीकर यांचा वाढदिवस उत्साहात

  बेळगाव : ज्येष्ठ पत्रकार व दैनिक रणझुंझारचे संपादक मनोहर कालकुंद्रीकर यांचा ७४ वा वाढदिवस येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी संभाजी संताजी यांनी मनोहर कालकुंद्रीकर यांच्या कार्याचा आढावा घेतला व उपस्थितांचे स्वागत केले. विशाल इन्फ्राबिल्डचे संचालक विजय पाटील, ड्रीम इंडिया कंपनीचे एम डी विजय पाटील, ज्येष्ठ पत्रकार …

Read More »

मुडा घोटाळा; सुनावणी ९ सप्टेंबरपर्यंत तहकूब

  मुख्यमंत्र्यांना आणखी कांही दिवस दिलासा बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जमीन वाटप प्रकरणाशी संबंधित खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा तहकूब केली. पुढील सुनावणी ९ सप्टेंबर रोजी होणार असून, तोपर्यंत सिद्धरामय्या यांना पुन्हा दिलासा …

Read More »

‘गिरीस्तुती’ आयोजित राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत मारली; बेंगळूर अर्बनच्या अथर्व वेंकटेश व लीह आर. जोसेफ यांची बाजी

  बेळगाव : बेंगळूर अर्बनच्या अथर्व वेंकटेश व लीह आर जोसेफ या बुद्धीबळपटूंनी गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेस फौंडेशन, बेळगाव आयोजित राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत बाजी मारली. शास्त्रीनगर-बेळगाव येथील गुजरात भवन येथे झालेल्या कर्नाटक राज्य 11 वर्षांखालील खुला गट फिडे रेटेड चेस चॅम्पियनशिप-2024 स्पर्धेत बेंगळूर अर्बनच्या अथर्व वेंकटेश याने पहिला तर …

Read More »

बेळगाव साहित्य परिषदेच्या वतीने शरद पवार यांना ग्रंथतुला नागरी सत्कारासाठी निवेदन

  बेळगाव : दि. 02 सप्टेंबर 2024 रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव शाखेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना ग्रंथतुला नागरी सत्कारासाठी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे पवार साहेबांनी आपल्या अतुलनीय कार्याचा सन्मान करण्यासाठी वेळ आणि उपलब्धता कळवावी, अशी विनंती केली आहे. साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष …

Read More »

सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी सोहळा आज

  बेळगाव : सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी मराठा मंदिर येथे दुपारी चार वाजता जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मंत्री जयंत पाटील व दिनेश ओऊळकर यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आवाहन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे एक ज्येष्ठ मार्गदर्शक आणि नेते कैलासवासी अर्जुनराव गोविंदराव घोरपडे यांची जन्मशताब्दी आज 2 सप्टेंबर 2024 रोजी मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे साजरी करण्यात येणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते पद्मविभूषण श्री. शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. जयंतराव पाटील, महाराष्ट्र राज्याच्या …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाच्या संगीत भजन स्पर्धेचा निकाल जाहीर

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्या वतीने दि. २८ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत आयोजित केलेल्या संगीत भजन स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक श्री संत तुकाराम भजनी मंडळ, माणगाव (चंदगड) आणि महिला गटात मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ, टिळकवाडी (बेळगाव) यांना देण्यात आला. या स्पर्धेत एकूण २६ भजनी …

Read More »

कॅप्टन कानडीकर यांना श्रद्धांजली अर्पण

  बेळगाव : “धनश्री सहकारी सोसायटीच्या उभारणीत आणि वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावलेले कॅप्टन गुंडोपंत कानडीकर यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून येणे अशक्य आहे. धनश्री सोसायटीला उच्च पदावर नेण हीच खरी श्रद्धांजली ठरेल” असे विचार धनश्री सोसायटीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक संजीव जोशी यांनी रविवारी दुपारी बोलताना व्यक्त केले. …

Read More »

बेळगावच्या राजाचे जल्लोषात स्वागत!

  बेळगाव : बेळगावचा राजा समजल्या जाणाऱ्या चव्हाट गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. शहरातील धर्मवीर संभाजी चौकात बेळगावच्या राजाचे प्रथम दर्शन झाले आणि आगमन सोहळ्याच्या भव्यदिव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. या आगमन सोहळ्यात जवळपास पाच ढोल पथक, 250 ढोल व 75 ताशे 50 ध्वज अश्या भव्य …

Read More »

पुस्तके वाचनातून आत्मविश्वास निर्माण होतो : मनोहर बेळगावकर

  कावळेवाडी (बेळगाव) : पुस्तके वाचा, लिहा लेखनातून व्यक्त होता येत. पुस्तके दिशा देण्याचे काम करतात अपयशातून खचून न जाता सातत्याने प्रयत्न करावा, यश नक्कीच मिळते अशा स्पर्धांतून प्रोत्साहन मिळते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता आहे योग्य मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. या स्पर्धेतून धीटपणा येतो बोलण्याची संधी मिळते चांगले वक्ते घडावेत …

Read More »