बेळगाव : संत श्री जलाराम फाउंडेशनतर्फे मी श्री जलाराम भक्ताकडून गरजूना आमरस आणि भाजी पुरी वितरित करण्यात आली.
संत श्री जलाराम फाउंडेशनतर्फे प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी नरगुंद भावे चौक स्थित भगवान श्रीदत्तात्रेय मंदिर परिसरात अन्नसेवा देण्यात येते. संत श्री जलाराम यांच्या एका भक्ताने आपल्या मुलीच्या स्मरणार्थ आमरस,पुरी, भाजी प्रसादाचा संकल्प केला होता. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यानी सर्व व्यवस्था करुन दिली आणि 350/375 भक्तानी व गरजूंनी आमरस, पुरीभाजीचा आस्वाद घेतला. संत श्री जलाराम फाउंडेशनतर्फे थंड पाण्याची पाणपोई सकाळ पासुन सुरु असते. दर गुरुवारी दुपारी ताक वितरण केले जाते. त्याचप्रमाणे दर गुरुवारी संध्याकाळी सात वाजता अन्नसेवा शुरु असते गरम पुलाव, गोड बुंदी व भावनगरी गांठी वितरण करण्यात येते. 350/375 भाविक आणि गरजू याचा लाभ घेत आहेत. जलाराम फाउंडेशनचे अघ्यक्ष कनुभाई ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व प्रेरणादायक उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. फाउंडेशनला मिळत असलेल्या भेटीदाखल दिलेल्या रकमेतुन व इतर सदस्यांचा सेवा सहयोगामुळे संत श्री जलाराम अन्नदान सेवा पांच वर्षांपासून निरंतर चालु आहे. कनुभाई ठक्कर, ललितभाई शाह, पुष्करभाई कक्कड, प्रकाश कुलकर्णी, राजेशभाई भाटीया, संजय देवाणी, अमीतभाई ठक्कर, श्रीकांत आदींचा या सर्व उपक्रमांना सहकार्य करीत आहे. तसेच रीक्षा ड्राइवर, भाजी, फळ विक्रेतेते व दत्त मंदीर व्यवस्थापनचे सहकार मीळत आहे.