Friday , October 18 2024
Breaking News

LOCAL NEWS

भटकी कुत्री पकडण्यासाठी तब्बल 47 लाखांवर खर्च?

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेने शहरातील भटकी कुत्री पकडण्यासाठी 3 वर्षांत तब्बल 47 लाख, 55 हजार 556 रुपये खर्च केले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मिळवून उजेडात आणली आहे. बेळगाव मनपाने 2014-15, 2017-18 आणि 2019-20 या 3 वर्षांत आपल्या हद्दीतील भटकी कुत्री पकडण्यासाठी एवढा प्रचंड …

Read More »

थेट कामगारांपर्यंत आर्थिक मदत पोचवा : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगार वर्गाला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने असंघटीत कामगारांना मदत जाहीर केली आहे ही मदत थेट कामगारांना मिळावी. सदर मदत वाटपात कोणत्याही एजंटचा हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशी सूचना वजा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी संबधितअधिकाऱ्यांना दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात …

Read More »

सावली वृद्धाश्रममधील निराधार महिलेचे निधन

हेल्प फॉर निडीकडून अंत्यसंस्कार बेळगाव : बागलकोट येथील गीता अशोक नार्गुंद (वय 74) या त्यांच्या पतीच्या निधनानंतर मुले नसल्याने गेले एक वर्षापासून सावली वृद्धाश्रमामध्ये राहत होत्या. त्यांचे आज सकाळी 11.30 वाजता वृद्धाकाळाने वृद्धाश्रमामध्ये निधन झाले.त्यांचा अंत्यसंस्कार हेल्प फॉर नीडीचे सुरेंद्र अनगोळकर यांच्या मदतीने डॉ. जयवंत पाटील यांनी सदाशिवनगर स्मशानभूमीत केला.या …

Read More »

भाजप आयोजित रक्तदान शिबिरात 25 रक्तदात्यांनी केले स्वयंस्फूर्तीने रक्तदान

बेळगाव : सौरभ सावंत (भाजप बेळगाव महानगर जिल्हा स्मित एक्झिट मेंबर) यांच्यावतीने दि. 8 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे उदघाटन भाजप खासदार श्रीमती मंगला अंगडी, भाजप बेळगाव महानगर जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील, दीपा कुडची (डायरेक्टर कर्नाटका स्टेट अर्बन वॉटर सप्लाय अँड ड्रेनेज बोर्ड), बेळगाव बीजेपी …

Read More »

रोटरी मिडटाऊनतर्फे समितीच्या कोविड सेंटरला जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

बेळगाव : मराठा मंदिर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आयसोलेशन कोविड केअर सेंटरला रोटरी क्लब मिडटाऊनतर्फे जीवनावश्यक वस्तू वितरित करण्यात आल्या.रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष अशोक कोळी, सचिव नागेश मोरे, रोटेरियन प्रकाश डोळेकर, संतोष नाईक आदींनी समितीच्या कोविड केअर सेंटरला तांदूळ, तेल, तूरडाळ, साखर, चहा पावडर, साबण आदी साहित्य कोविड केअर सेंटरचे संचालक …

Read More »

संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज

बेळगाव : मागील दोन वर्षांचा अनुभव बघता यावर्षीही जनतेला पूरपरिस्थितीचा सामना करावा लागणार आहे त्यासाठी प्रशासन पूर्व तयारीला लागले असून 500 निवारा केंद्रे स्थापन करण्यात येणार असून तालुका निहाय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. वास्तविक दरवर्षी 100 च्या आसपास निवारा केंद्र उभारण्यात येतात पण सध्याच्या कोरोनाच्या काळात पूरग्रस्तांना दाटीवाटीने …

Read More »

बस तिकीट दरवाढ नाही : परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी

बेंगळुरू : कोरोना लॉकडाऊनच्या ओझ्याखाली दबलेल्या जनतेत आता दुसरे ओझे उचलायची ताकद राहिलेली नाही. त्यामुळेच राज्यात बस तिकीट दरात वाढ न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.बंगळुरात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी सध्या सरकार बस तिकीट दरात कोणतीही वाढ करणार नसल्याचे स्पष्ट केले. गरीब व जनसामान्यच …

Read More »

माजी मंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ आमदार सी. एम. उदासी यांचे निधन

बेंगळुरू : माजी मंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ आमदार सी. एम. उदासी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.बंगळूरच्या नारायण हृदयालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचाराचा फायदा न होता त्यांचे निधन झाले. हावेरी जिल्ह्यातील हनगल मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. हावेरीचे खासदार शिवकुमार उदासी हे त्यांचे पुत्र होत.मुख्यमंत्री बी. एस. …

Read More »

आरसीयुतर्फे कोरोना जागृती, फूडकीट्सचे वाटप

बेळगाव : बेळगावच्या आरसीयु अर्थात राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्ययन पीठातर्फे कलारकोप्प गावात कोरोना जागृती आणि फूड कीट्सचे वाटप करण्यात आले. कोविड -१९ महामारीमुळे संकटात सापडलेल्या भूतरामनहट्टी, बेन्नाळी आणि कलारकोप्प गावातील सुमारे ३०० कुटुंबाना फूड किट्स वाटण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर प्रांत कार्यवाह राघवेंद्र …

Read More »

कर्नाटक सीईटी परीक्षा २८,२9 ऑगस्टला

बेंगळुरू : अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट २८ आणि २९ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी दिली आहे.दरम्यान सीईटी परीक्षा २८ आणि २९ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. प्रत्येक विषयात ६० गुण असतील,” असे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी मंगळवारी …

Read More »