बेळगाव : बेकिनकेरे येथील ग्रामदैवत श्री नागनाथ देवस्थान येथील काल शुक्रवारी रात्री पाच लाख रुपयाची धाडसी चोरी करण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थ व देवस्थान कमिटी तसेच देवस्थानच्या भक्तांकडून या प्रकरणामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सहा वर्षात नागनाथ मंदिरात तिसऱ्या वेळी चोरीची घटना घडली असून यापूर्वी मंदिरातील तांब्याच्या वस्तूंची चोरी …
Read More »LOCAL NEWS
श्री गाडगेबाबा गौरव पुरस्काराने सुरेंद्र अनगोळकर सन्मानित
बेळगाव : मराठा रजक समाज बेळगाव या संस्थेतर्फे सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे संस्थापक समाजसेवक अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल ‘श्री गाडगेबाबा गौरव पुरस्कार’ देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. शहापूर हुलबत्ते कॉलनी येथील श्री गाडगेबाबा भवन येथे मराठा रजक समाजातर्फे गेल्या मंगळवारी श्री संत गाडगेबाबांची 66 वी पुण्यतिथी …
Read More »कोल्हापूर येथील धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
तालुका म. ए. समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा निर्धार बेळगाव : कर्नाटक सरकारने येथील म. ए. समितीचा मेळावा होऊ दिला नाही. त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कर्नाटकने केले असून त्याविरोधात आता कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दि. 26 रोजी धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मोठ्या संख्येने म. ए. समितीच्या …
Read More »दिग्विजय युथ क्लब मण्णूरतर्फे प्रीमियर लीग सिझन-४ उत्साहात
बेळगाव : दिग्विजय युथ क्लब मण्णूरतर्फे मण्णूर प्रीमियम लीग सिझन – ४ चे आयोजन करण्यात आले होते. रविवार दि. १८ डिसेंबर रोजी मण्णूर येथील छत्रपती शिवाजी मैदानावर या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते आर. एम. चौगुले आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांच्याहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या …
Read More »कै. एम. डी. चौगुले प्रतिष्ठानच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन
बेळगाव : मण्णूर येथील कै. एम. डी. चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेसाठी अनेक विधायक कार्य करणाऱ्या संघाच्या माध्यमातून सहकार्याच्या भावनेतून नेहमीच खारीचा वाटा उचलणाऱ्या प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हातभार लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगाव परिसरातील …
Read More »कायदा-सुव्यवस्था राखणे प्रत्येकाचे कर्तव्य : एडिजीपी अलोक कुमार
बेळगाव : सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत सीमाभागात कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखण आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडिजीपी) अलोक कुमार यांनी केले. टिळकवाडी पोलीस ठाण्यात आज शुक्रवारी झालेल्या म. ए. …
Read More »शेतकऱ्यांनी साजरा केला कृषी दिन
बेळगाव : २३ डिसेंबर हा भूतपूर्व पंतप्रधान तसेच समस्त देशातील शेतकऱ्यांचे श्रध्दास्थान म्हणून प्रचलित असलेले चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय कृषी दिन म्हणून देशभर पाळला जातो. आज दर्श वेळा आमावस्या म्हणजे शेतकरी आपल्या शेतातील बहरलेल्या पिकांची पूजा करण्यासाठी गोड जेवण तयार करुन सहकुटूंब शेतात जाऊन पूजा करतात. हा …
Read More »सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात द्वेषाचे राजकारण
बेळगाव : भाजपा, आरएसएस नेहमीच देशभरात द्वेषाचे राजकारण करत आहे. मात्र यापुढे असे द्वेषमूलक राजकारण खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा मराठा समाजाच्या नेत्यांनी दिला आहे. बेळगाव केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी हे मराठा आणि हिंदू समाजाच्या विरोधात नाहीत. मात्र भाजप आणि आरएसएस हे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात …
Read More »विधानसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब
बेळगाव : सुवर्णसौधमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात आज विधानसभेचे कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानंतर सोमवारी सकाळपर्यंत तहकूब करण्यात आले. पाच दिवसांचा आठवडा या हिशेबाने आज शुक्रवारी विधिमंडळ कामकाजाचा सप्ताह अखेरचा दिवस होता. आज सकाळी विधानसभेत नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तराच्या तासात कामकाज चालले. अनेक महत्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा झाली. विशेष म्हणजे सप्ताह अखेरच्या दिवशी …
Read More »सीमाबांधवांचा सच्चा कैवारी हरपला! ॲड. राम आपटे यांचे निधन
बेळगाव : सीमाप्रश्न तज्ञ समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. राम महादेव आपटे (दादा) यांचे वयाच्या 97 व्या वर्षी राणी चन्नमा नगर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. १९२६ साली जन्मलेले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींचे अनुयायी बनून छोडो भारत चळवळीचे कार्यकर्ते बनलेले, पुढे सीमाप्रश्नाच्या कायदेशीर लढ्यात सक्रिय झालेले, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta