Monday , September 21 2026
Breaking News

दिग्विजय युथ क्लब मण्णूरतर्फे प्रीमियर लीग सिझन-४ उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : दिग्विजय युथ क्लब मण्णूरतर्फे मण्णूर प्रीमियम लीग सिझन – ४ चे आयोजन करण्यात आले होते. रविवार दि. १८ डिसेंबर रोजी मण्णूर येथील छत्रपती शिवाजी मैदानावर या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते आर. एम. चौगुले आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांच्याहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिग्विजय युथ क्लबचे अध्यक्ष विजय मंडोळकर हे होते. श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडुस्कर यांच्याहस्ते शिवप्रतिमा पूजन पार पडले.

आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, मण्णूर देवस्की पंच कमिटी अध्यक्ष मुकुंद तरळे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, भाजपचे माजी ग्रामीण मंडळ अध्यक्ष विनय कदम, शंकर सांबरेकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

काँग्रेस युवा नेते जयवंत बाळेकुंद्री आणि मण्णूर ग्रामपंचायत सदस्य मधुकर चौगुले यांच्याहस्ते मैदानाचे पूजन करून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.

यावेळी भरमा आनंदाचे, सागर कटग्याण्णावर, अनिल काकतकर, किरण चौगुले, सचिन मंडोळकर, आर. आय. पाटील, विक्रम यळगूकर, सुजित मंडोळकर, उमेश चौगुले, लक्ष्मण शहापूरकर, सुनील मंडोळकर, हरी शहापूरकर, संतोष केंचन्नावर, संजय कडोलकर, बबन चौगुले, युवराज काकतकर, भैरू चौगुले, उमेश चौगुले, भरत चौगुले, महेश चौगुले, संदीप कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *