Monday , September 21 2026
Breaking News

कै. एम. डी. चौगुले प्रतिष्ठानच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : मण्णूर येथील कै. एम. डी. चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेसाठी अनेक विधायक कार्य करणाऱ्या संघाच्या माध्यमातून सहकार्याच्या भावनेतून नेहमीच खारीचा वाटा उचलणाऱ्या प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हातभार लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बेळगाव परिसरातील तज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून आजवर या व्याख्यानमालेचा लाभ घेणारे अनेक विद्यार्थी आज इंजिनियरिंग, डिप्लोमा, नर्सिंग, मेडिकल सारख्या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत.
व्याख्यानमाला आयोजित करण्याचे हे सलग सहावे वर्ष असून सलग सहा रविवार हि व्याख्यानमाला चालणार आहे. व्याख्यानमालेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकर्षक बक्षिसे देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शिवाय विषयवार प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीमती द्रौपदी एम. चौगुले मातृमांगल्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

या व्याख्यानमालेला रविवार दि. २५ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून मराठी विषयावर ठळकवाडी हायस्कुलचे शिक्षक सी. वाय. पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर १ जानेवारी २०२३ रोजी ठळकवाडी हायस्कुलचे कन्नड विषयाचे शिक्षक संजीव कोष्टी, ८ जानेवारी रोजी मराठी विद्यानिकेतनचे इंग्रजी विषयाचे शिक्षक सुनील लाड, १५ जानेवारी रोजी बेनकनहळ्ळी येथील शिवराज हायस्कुलचे गणित विषयाचे शिक्षक पी. आर. पाटील, २२ जानेवारी रोजी ठळकवाडी हायस्कुलचे विज्ञान विषयाचे शिक्षक सुरेश भातकांडे आणि २८ जानेवारी रोजी सरदार्स हायस्कुलचे समाज परिचय विषयाचे शिक्षक रणजित चौगुले यांचे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानमालेचा लाभ विद्यार्थ्यांनी घेऊन अधिक गुणवत्ता प्राप्त करावी, असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक आर. एम. चौगुले आणि सचिव डी. एम. चौगुले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४४८४८७५९५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *