बेळगाव : भाजपा, आरएसएस नेहमीच देशभरात द्वेषाचे राजकारण करत आहे. मात्र यापुढे असे द्वेषमूलक राजकारण खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा मराठा समाजाच्या नेत्यांनी दिला आहे.
बेळगाव केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी हे मराठा आणि हिंदू समाजाच्या विरोधात नाहीत. मात्र भाजप आणि आरएसएस हे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात षड्यंत्र रचून द्वेषाचे राजकारण करत आहेत ते मराठा समाज कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा मराठा समाजाच्या नेत्यांनी देत आपला संताप व्यक्त केला.
बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सतीश जातकीहोळी यांनी मराठा समाजासह संपूर्ण मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. त्यांनी कधीच कोणत्याच समाजावर अन्याय केलेला नाही. मात्र यमकनमर्डी मतदारसंघातील काही लोक आमदार जारकीहोळी हे मराठा समाजाच्या विरोधात असल्याचा अपप्रचार करत आहेत त्याला आमचा विरोध आहे असेही ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी निपाणी येथे झालेल्या एका कार्यक्रमात शिवरायांवर भाष्य केले होते. मात्र काही लोकांनी जारकीहोळींच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून अपप्रचार करत आहेत. भाजपच्या द्वेषमूलक राजकारणाला बळी न पडता मराठा समाजाने एकजुटीने जारकीहोळींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. सतीश जारकीहोळी यांनी कन्नड, मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. यमकनमर्डी मतदारसंघात तसेच बेळगांव जिल्ह्यातील अनेक गावामध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे बसविण्यात सतीश जारकीहोळींचा मोठा वाटा आहे. भाजपा निवडणुका आल्या की जातीचे राजकारण करते व जातीय तेढ निर्माण करते यापुढे भाजपाचे द्वेषमूलक राजकारण मराठा समाज कदापि खपवून घेणार नाही, असे मराठा समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
यावेळी अरुण कटांबळे, भाऊराव गडकरी, आनंद पाटील, मनोहर हुक्केरीकर, संदीप जक्कने, सागर पिंगट, चंद्रकांत धुदुम, सिद्धराय गवी, अन्नू कटांबळे, विजय होनमाने, नागेश पाटील, वीरभद्र मुंगारी, रामरोला आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थि त होते.