Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

कॅपिटल वन एसएसएलसी व्याख्यानमाला लांबणीवर; ७ ऐवजी २८ डिसेंबर रोजी

  बेळगांव : कॅपिटल वन यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आयोजित एसएसएलसी व्याख्यानमाला येत्या रविवार, दि. 07 डिसेंबर 2025 रोजी नियोजित होती. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून आता व्याख्यानमाला रविवार, दि. 28 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. संस्थेकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार, सर्व शिक्षक व पालकांनी …

Read More »

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी तीन टप्प्यांच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अलीकडे केवळ पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने तिसऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मंडळाने अधिकृत निवेदन देत गोंधळ …

Read More »

इंडिगोची उड्डाणे विस्कळीत; बंगळुरात १०२ उड्डाणे रद्द; प्रवाशांचा चौथ्या दिवशीही उसळला संताप

  बंगळूर : ऑपरेशनल अडचणींमुळे इंडिगो एअरलाइन्सच्या सेवा चौथ्या दिवशीही विस्कळीत झाल्या असून, आज केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल १०२ उड्डाणे रद्द करण्यात आली. ५२ आगमन आणि ५० निर्गमन रद्द झाल्याने शेकडो प्रवासी विमानतळावर तासन्तास अडकून पडले. काहींना तर १२ तासांपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागली. विमान उशिरा येणे आणि वेळोवेळी रद्द …

Read More »

फ्रिजमधील शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; एचईआरएफच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

  बेळगाव : बेळगाव येथील सुळगा-उचगाव गावात एका घरात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याने मोठी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती. बेळगावच्या सुळगा-उचगाव गावातील देशपांडे गल्लीत आज सकाळी सुमारे १० वाजता शॉर्ट सर्किटमुळे एका घरात मोठी आग लागून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घरात गॅस सिलिंडर असल्याने स्फोटाची भीती होती, मात्र …

Read More »

प्रशासकीय सुधारणांसाठी जिल्ह्यांचे विभाजन आवश्यक : माजी आमदार संजय पाटील

  बेळगाव : बेळगाव येथील हिवाळी अधिवेशन केवळ औपचारिकता म्हणून न घेता, ते उत्तर कर्नाटकातील जनतेच्या समस्यांना प्रतिसाद देणारे असावे. उत्तर आणि दक्षिणेकडील विकासातील विषमता दूर केल्यास, ‘वेगळ्या राज्याची’ मागणी होणार नाही, असे मत माजी विधान परिषद मुख्य सचेतक महांतश कवठगीमठ यांनी व्यक्त केले. आमदार महांतेश कवठगीमठ यांनी आज बेळगाव …

Read More »

शरीर सौष्ठव स्पर्धेत यश संपादन केलेल्या विजेत्यांचा जिल्हा व राज्य शरीर सौष्ठव संघटनेच्या वतीने सत्कार

  बेळगाव : विविध शरीर सौष्ठव स्पर्धामध्ये यश संपादन केलेल्या विजेत्या स्पर्धकांचा जिल्हा व राज्य शरीर सौष्ठव संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. क्लब रोड येथील डॉ. संजय अण्णा सुंठकर यांच्या कार्यालयामध्ये बेळगांव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्स व कर्नाटक स्टेट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स च्यावतीने मी. आशिया व …

Read More »

डाॅ. जयसिंगराव पवार यांची मराठी विद्यानिकेतन शाळेला सदिच्छा भेट

  बेळगाव : गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील आघाडीचे इतिहास संशोधक, इतिहासकार, समाज प्रबोधक, इतिहासाचे नामवंत प्राध्यापक माननीय डॉ. जयसिंगराव पवार यांनी मराठी विद्यानिकेतन शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या पत्नी वसुधा पवार तसेच इतिहास संशोधक मंजुश्री पवार (कोल्हापूर). या वर्षाचा गुरुवर्य शामराव देसाई पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते किशोर …

Read More »

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक; महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार

  बेळगाव : येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक दिनांक 04 डिसेंबर 2025 रोजी श्री बालशिवाजी वाचनालय, येळ्ळूर येथे समितीचे अध्यक्ष श्री. विलास घाडी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीच्या प्रारंभी गावातील निधन पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक व पर्यावरणप्रेमी डॉ. शिवाजी कागणीकर(दादा) यांना राणी चन्नम्मा …

Read More »

चिंचली मायाक्का जत्रेत चक्क दोन वर्षाच्या जुळ्या मुलांना पालकांनी सोडले!

  बेळगाव : चिंचली मायाक्का जत्रेत पालकांनी चक्क दोन वर्षाच्या जुळ्या मुलांना सोडून दिले. कुडची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि मुलांना बेळगावच्या बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले आहे. कुमार बाबू आणि कुमारी सोनी यांनी २ वर्षांच्या जुळ्या मुलांना तात्पुरते स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठान दत्तक केंद्रात ठेवले आहे. …

Read More »

ग्रामीण आणि माळमारुती पोलीस स्थानकाच्या हद्दीत दोन मटका बुकींना अटक

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण आणि माळमारुती पोलीस स्थानकाच्या हद्दीत मटका जुगाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन मटका बुकींना अटक करून त्यांच्याकडील ओसी मटक्याच्या चिठ्ठ्या व रोख रक्कम जप्त केली. अटक केलेल्या आरोपींची नावे श्याम भगवानदास गुलबानी (राहणार सिंधी कॉलनी हिंडलगा) तर सुनील देवाप्पा कांगली (आंबेडकर नगर, सदाशिव नगर बेळगाव). श्याम गुलबानी …

Read More »