Sunday , July 26 2026
Breaking News

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक; महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक दिनांक 04 डिसेंबर 2025 रोजी श्री बालशिवाजी वाचनालय, येळ्ळूर येथे समितीचे अध्यक्ष श्री. विलास घाडी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
बैठकीच्या प्रारंभी गावातील निधन पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक व पर्यावरणप्रेमी डॉ. शिवाजी कागणीकर(दादा) यांना राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली याबद्दल त्यांचा अभिनंदन ठराव घेण्यात आला. तसेच सोमवार दि. 8 डिसेंबर 2025 रोजी कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीचा महामेळावा होत असून या मेळाव्याला येळ्ळूर विभाग म. ए. समितीकडून जाहीर पाठींबा दर्शविला गेला. यावेळी बैठकीत अध्यक्ष विलास घाडी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “येळ्ळूर गावाने सीमाप्रश्नासाठी दिलेले योगदान आणि केलेला त्याग अमूल्य आहे. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातील संघर्षातही येळ्ळूरचे योगदान अग्रक्रमी राहिले आहे.”
ग्रामपंचायत माजी अध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सतीश बा. पाटील यांनी युवकांना उद्देशून आवाहन केले की, “मराठीवरील अन्यायाविरोधात युवकांनी एकत्र येऊन मराठी अस्मिता आणि सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घ्यावा. ‘महामेळावा यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकतेचा संदेश द्यावा.” तसेच यावेळी शांताराम कुगजी माजी अध्यक्ष येळ्ळूर विभाग व रामदास धुळजी उपाध्यक्ष येळ्ळूर विभाग म. ए. समिती यांनीही आपले विचार व्यक्त केले.
बैठकीस ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, रमेश मेणसे, ग्राम पंचायत सदस्या शालन पाटील, मनीषा घाडी, मनोहर आ. पाटील, परशराम घाडी, मनोहर सी. पाटील, मधु पाटील, लक्ष्मण छत्र्यानावर, शुभम जाधव, सिद्धार्थ पाटील, मल्लाप्पा काकतीकर, मनोज बेकवाडकर, अशोक हट्टीकर, बापूसाहेब पाटील, रुपेश मेलगे, विवेक हुंदरे, लक्ष्मण मेलगे, हणमंत पाटील, संदीप बा पाटील, कार्तिक संभाजीचे, आनंद घाडी आदी समितीनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचा समारोप राजू उघाडे सचिव, यांच्या आभारप्रदर्शन करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *