Wednesday , January 14 2026
Breaking News

फ्रिजमधील शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; एचईआरएफच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील सुळगा-उचगाव गावात एका घरात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याने मोठी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती. बेळगावच्या सुळगा-उचगाव गावातील देशपांडे गल्लीत आज सकाळी सुमारे १० वाजता शॉर्ट सर्किटमुळे एका घरात मोठी आग लागून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घरात गॅस सिलिंडर असल्याने स्फोटाची भीती होती, मात्र एच.ई.आर.एफ. बचाव पथकाच्या त्वरित कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. मनोहर पाटील यांच्या मालकीच्या घरात भाड्याने राहणारे दिव्यांग संजय बबन जाधव यांच्या घरी ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, घरात कोणी नसताना फ्रिजमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग वेगाने पसरत असल्याचे शेजाऱ्यांनी पाहताच त्यांनी त्वरित एच.ई.आर.एफ. पथकाला माहिती दिली. माहिती मिळताच पथक घटनास्थळी धावले आणि त्यांनी उपलब्ध असलेल्या पाईप व मोटारींच्या साहाय्याने आग विझवण्यास सुरुवात केली. या कार्यात स्थानिक नागरिकांनीही सक्रिय सहकार्य केले. घरात सुमारे ६० टक्के आग पसरली होती आणि घरात दाट धूर असल्याने सिलिंडरमुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती. या गंभीर परिस्थितीत पथकप्रमुख बसंतराज हिरेमठ यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, धुरामध्ये घरात प्रवेश केला आणि गॅस सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांच्या या धाडसी आणि मानवतावादी कार्यामुळे मोठा स्फोट टळला. थोड्या वेळाने बेळगाव अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी उर्वरित आग पूर्णपणे विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या आगीत घरातील वस्तू आणि साहित्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दिव्यांग संजय जाधव यांचे कुटुंब हॉटेलमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह चालवते. या आगीत त्यांच्या घरगुती वापरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आवाहनाला प्रतिसाद “मराठी सन्मान यात्रे”ला मदतीचा हात

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्यावतीने सीमाभागात काढण्यात येणाऱ्या “मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *