नवी दिल्ली : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २५ पैसे आणि डिझेलवर ३० पैशांची वाढ करण्यात आले आहे. पेट्रोल प्रतिलिटर १००.१९ रुपये आणि डिझेल ९२.१७ रुपये दराने विक्री होत आहे. दिल्लीत पेट्रोल ९३.९४ तर डिझेल ८४.८९ प्रतिलिटर विक्री होत आहे.
सतत होणाऱ्या पेट्रोल दरवाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज (शनिवार) पुन्हा एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यापासून मे महिन्यात १६ दिवस इंधनाच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. दरम्यान मागच्या १६ दिवसांत एकही दिवस पेट्रोल आणि डिझेल दरात एकदाही कपात झाली नाही.