Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्वालेला भक्तीपूर्वक अभिवादन

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धारकऱ्यांनी सांगली येथून आणलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्वालेचे संकेश्वरात भक्तीपूर्वक अभिवादन करण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्मासाठी केलेले बलिदान तरुणांना समजावे, या हेतूने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने बलिदान मास आचरणात आणण्यात आला. बलिदान मासची सांगता फाल्गुन अमावस्येला (मृत्युंजय अमावस्या) शुक्रवार 1 एप्रिल रोजी हिणार आहे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी हिंदुधर्मासाठी आपल्या प्राणाचं तब्बल 30 दिवस औरंगजेबचे पाशवी अत्याचार सहन करून बलिदान दिलं ते बलिदान हिंदूधर्म कधीच विसरू शकत नाही. शनिवारी सांगली येथून धारकऱ्यांनी धर्मवीर ज्वाला संकेश्वरात आणली. त्याचे भक्तीपूर्वक अभिवादन करण्यात आले.यावेळी जयप्रकाश सावंत, नेताजी आगम, सुभाष कासारकार, समीर पाटील, वैभव शिवने, दत्ता थोरवात, मारुती सावंत आर्यन मोरे, परशराम सावंत, संकेत पोवार, नयन पोवार, अमोल कोल्हे, संतोष लोखंडे, ओंकार भिसे, यश नार्वेकर, चंद्रकांत चौगुले, अभिषेक सुतार, श्रीजित शिंत्रे, ऋग्वेद मूळे, शिवा दिंडे, महेश, शुभम, अनिकेत, तसेच शिव-शंभू प्रेमी मोठ्या संख्येने हजर होते.

संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा फाल्गुन अमावस्या शुक्रवार 1 एप्रिल रोजी गांधी चौक येथून संध्याकाळी ठीक 5 वाजता सुरवात होणार आहे, सर्व हिंदूंनी आपलं कर्तव्य म्हणून उपस्थित रहा.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *