संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर एसडीव्हीएस शिक्षण संस्थेतर्फे सहकार शिल्पी, शिक्षणप्रेमी दिवंगत बसगौडा पाटील यांचा जन्मदिवस आचरणेत आला. शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी बसगौडा पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बसगौडा पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त माजी मंत्री ए. बी. पाटील यांच्या हस्ते एस. एस. कला आणि टीपीएस विज्ञान महाविद्यालयातील नवीन संगणक कक्ष आणि प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. जी. एस. इंडी, संचालक अॅड. आर. बी. पाटील, गंगाधर मुडशी, बसनगौडा पाटील, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. ए. पुजार, प्राचार्य डॉ. टी. एस. मन्नोळी, डॉ. एस. आय. मडीवाळप्पागोळ, श्रीमती एस. यु. यरगट्टी, प्रशांत मन्नीकेरी, प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta