Tuesday , March 3 2026
Breaking News

डॉ. मुरगुडे यांना नेत्रसेवेने श्रध्दांजली

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे त्यांच्या धर्मपत्नी डॉ. श्वेता मुरगुडे, कन्या कु. सिया मुरगुडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा नेत्रसेवेचा वारसा आता हुबळी येथील एम.एम.जोशी नेत्र विज्ञान संस्था पुढे चालविणार असल्याचे कम्युनिटी इन्चार्ज संजय कुलकर्णी, कुतबुद्दीन मुल्ला (सीईओ) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


येथील डॉ. मुरगुडे इस्पितळात ते पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले, डॉ. सचिन मुरगुडे यांच्या नेत्रसेवेचा शुभारंभ हुबळी येथील एम.एम.जोशी विज्ञान संस्था शनिवार दि. 16 एप्रिल 2022 रोजी करीत आहे. येथील श्री शंकरलिंग समुदाय भवन येथे नेत्रसेवेचा कार्याचा शुभारंभ निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात माजी खासदार रमेश कत्ती, संकेश्वर आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. नंदकुमार हावळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
हुबळी येथील एम. एम. जोशी नेत्र विज्ञान संस्थेने नेत्रसेवेत भरीव अशी कामगिरी केली आहे. त्याचा लाभ आत संकेश्वरातील लोकांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *