

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील सर्वच श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासून श्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी भक्तगणांंनी मोठी गर्दी केलेली पहावयास मिळाली. येथील श्री विठ्ठल मंदिरात पवनपूत्राच्या प्रतिमा पूजनाने जन्मोत्सव साजरा करण्यात आला. विनायक भागवत यांनी श्री मारुती प्रतिमेचै पूजन केले. भक्तगणांना प्रसाद स्वरुपात सुंठवडा वाटप करण्यात आला. यावेळी प्रसाद भागवत, चरण खटावकर, श्रीनिवास कोळेकर, प्रसाद काकडे, ओंकार खटावकर, अमृत अनसकर उपस्थित होते. येथे उद्या रविवार दि. १७ रोजी रात्री ८ वाजता महाप्रसाद ठेवून घेण्यात आले आहे. येथील पोवार चाळीतील श्री हनुमान मंदिरात महिला भक्तगणांनी पाळनागीत गात हनुमान जन्मकाळ साजरा केला. येथील बसवान गल्ली, अंकली वेस, वडर गल्ली, हनुमान नगर, नदी गल्ली, तसेच गावातील सर्वच हनुमान मंदिरात हनुमान जयंती भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta