
संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी मठाचे मठाधिपती पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी शेताकडे फेरफटका मारण्यासाठी निघाले असता वाटेत श्रींना छोटी मुले क्रिकेट खेळातांना दिसली. श्रींना आपणही क्रिकेट खेळायचा आनंद लुटावा असे वाटले. श्रींची सवारी शेताकडे न जाता क्रिकेट मैदानाकडे वळाली. स्वामीजींनी मुलांकडून बॅट घेतली अन् मुलांचा आनंद द्विगुणित झाला. क्रिकेट खेळात स्वामीजी बॅटसमन (फलंदाज) बनले. गोलंदाज महादेव ब्याळी यांचा पहिला चेंडू स्वामीजींनी लगावला. तो चौकार ठरला. एक ओव्हर (षटक) क्रिकेट मॅच खेळून श्रींनी क्रिकेटचा आनंद घेतला. निडसोसी मठाचे महास्वामीजीं फलंदाज बनलेला व्हिडिओ भक्तगणांत चांगलाच चर्चेत दिसतो आहे. श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी हे खेळाडूवृतीचे असल्याने अनेक चांगल्या-वाईट सामन्यांचा त्यांनी मुकाबला केला आहे. निडसोसी मठाला कर्नाटक, महाराष्ट्र तसेच अनेक राज्यांतील भक्तगण लाभला आहे.
मी भाग्यवान गोलंदाज…

महादेव ब्याळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, चालते-बोलते देव क्रिकेट मैदानावर पाहून मला मोठा आनंद झाला. फलंदाज (स्वामीजींना) बाॅलिंग करण्याचे सौभाग्य आपणाला लाभले. त्यामुळे आपण भाग्यवान गोलंदाज बनलो आहोत. एक ओव्हर क्रिकेट खेळून श्रींनी क्रिकेटचा आनंद घेतला. श्रींच्या क्रिकेट खेळाची भक्तगणांतून चर्चा होताना दिसत आहे. आपण सर्वांना मोठ्या अभिमानाने सांगत आहोत श्रींना आपण गोलंदाजी केली आहे. श्रींच्या क्रिकेट सामन्यात सहभागी मुले देखील हर्षोल्लासाने आपण स्वामीजींच्याबरोबर क्रिकेट खेळल्याचे सांगताहेत.
Belgaum Varta Belgaum Varta