Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव शिवजयंती उत्सव मंडळांचे कार्यक्रम जाहीर

Spread the love


बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ बेळगाव यांनी आपला शिवजयंती उत्सवाचा कार्यक्रम जाहीर केला असून तो खालील प्रमाणे आहे.
सोमवार दि. 2 मे 2022 रोजी सकाळी 7 वाजता शिवज्योतीचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक बेळगाव येथे. त्यानंतर सकाळी 9 वाजता नरगुंदकर भावे चौकातील मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व आरती, तसेच सकाळी 10 वाजता शहापूर शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण आणि पूजन. बुधवार दि. 4 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता श्रींच्या पालखीचे पूजन करून नरगुंदकर भावे चौकातून शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीची सुरुवात. रविवार दि. 8 मे 2022 रोजी येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे शिवजयंतीनिमित्त सकाळी 8 वाजता राजहंसगड चढणे-उतरणे स्पर्धा.
शहापूर शिवजयंती मिरवणूक कार्यक्रम जाहीर
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचा कार्यक्रम निश्चित झाला असून बुधवार दि. 4 मे रोजी सायंकाळी 7 वाजता बॅ. नाथ पै चौक येथे मिरवणुकीचे उद्घाटन केले जाणार आहे.
चित्ररथ मिरवणूक उद्घाटन समारंभास मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून शहापूर विभागातील सर्व मंडळांनी आपले चित्ररथ बॅ. नाथ पै चौकात वेळेवर आणावेत. मिरवणूक अत्यंत शांतपणे व उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व शिवजयंती उत्सव मंडळांसह समस्त शिवभक्तांनी सहकार्य करावे, अशी विनंती महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, कार्याध्यक्ष महादेव पाटील आणि नगरसेवक नितीन जाधव यांनी केले आहे.
शहापूर येथील चित्ररथ मिरवणुकीचा मार्ग पुढीलप्रमाणे असणार आहे. बॅरिस्टर नाथ पै चौक येथून प्रारंभ खडेबाजार शहापूर, एसपीएम रोड, रेल्वे ब्रिज मार्गे शनिमंदिर, स्टेशन रोड मार्गे सेंट मेरीज हायस्कूल, मारुती पुतळा तेथून धर्मवीर संभाजी चौक मार्गे मुख्य मिरवणुकीत सहभाग पुढे किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली मार्गे स्टेशन रोड, शनी मंदिर मार्गे रेल्वे ब्रिज, एसपीएम रोड मार्गे शहापूर येथे सांगता.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *