Tuesday , March 3 2026
Breaking News

गोरगरिब कष्टकरी मुलांच्या शिक्षणाला हातभर लावा : अ‍ॅड. पवन कणगली

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : गोरगरिब कष्टकरी लोक वाढत्या महागाईमुळे त्रस्त आहेत. त्यांना मुलांचा शैक्षणिक खर्च परवडेनासा झाला आहे. यातून मुलाना शाळा सोडविण्याच्या घटना घडू नयेत. यासाठी सधन लोकांनी गोरगरिब कष्टकरी सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुलांच्या शिक्षणाला हातभर लावण्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. पवन कणगली यांनी सांगितले. त्यांनी गरीब कुटुंबातील दहा मुला-मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन आपले मनोगत व्यक्त केले. कणगली गार्डन येथे पवन कणगली यांच्या हस्ते कुमारी सृष्टी एम.परीट, फातिमा एल. मोमीन, श्रेयस पाटील, श्रावणी पाटील तसेच अन्य मुला-मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रविण खातेदार, पत्रकार महंमद मोमीन, पांडुरंग पाटील, उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *