Sunday , June 7 2026
Breaking News

केएलई एनएसएस छात्रांचे कुर्लीत विशेष शिबीर

Spread the love

सार्वजनिक स्वच्छता : विविध विषयावर मार्गदर्शन
निपाणी (वार्ता) : राणी चन्नम्मा विश्वविद्यालय, केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या वतीने 31 मे पासून 6 जून पर्यंत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबीराचे आयोजन कुर्ली येथे करण्यात आले होते. त्यानुसार दत्तक ग्राम विकास योजनेनुसार एनएसएसचे विद्यार्थ्यांनी गावात विविध उपक्रम राबविले आहेत.
31 रोजी प्राथमिक सरकारी कन्नड – मराठी शाळा आवारात या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलपती प्रा. एम. रामचंद्रगौडा, के. व्ही. कादरी, प्रताप लिंगय्या, डॉ. बसवराज पद्मशाली, विरनगौडा पाटील, डी. एन. पाटील, बी. एस. नावी, अमर बागेवाडी, किरण निकाडे, संदीप निकाडे, के. वाय. मगदूम, दिलीप जाधव, सिताराम चौगुले, बाबुराव वैराट, संतोष पाटील, मुरलीधर पाटील, जे. एस. माळी, प्राचार्य एम. एम. हुरळी, डॉ. आर. जे. खराडे, डॉ. बी. एस. कांबळे यांच्यासह एनएसएस स्वयंसेवकांची उपस्थिती होती. विशेष शिबीराच्या अनुषंगाने एन.एस.एस. विद्यार्थी गावाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विशेष अहवाल तयार करणार आला. शिबिरातील उपक्रमांमध्ये शाळा आवार, खेळाच्या मैदानाची स्वच्छता, गावातील शौचालयांची तसेच बेरोजगारी आणि साक्षरतेच्या प्रमाणाचा सर्व्हे, गटारी, रस्त्यांची स्वच्छता, कृषी विषयक शेतकर्‍यांना मार्गदर्शन, परिसर संरक्षणासाठी आणि प्लास्टिक मुक्त भारतसाठी जनजागृती, सौर उर्जेविषयी ग्रामस्थांना माहिती देवून त्यांना सौर उर्जेच्या वापरासाठी प्रवृत्त करणे, एड्स, डेंग्यु, चिकनगुन्या आजाराविषयी जागृती, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, जनावरांची तपासणी, दिपोत्सव तसेच सांस्कृतिक कार्यक्रमा, ऐतिहासिक स्मारकांची निगा राखणे आदी उपक्रम राबविले. सदर शिबीर जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाचे एन.एस.एस. अधिकारी डॉ. एस. एम. रायमाने, प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आले. एनएसएसने आपल्या गावाची निवड करून लोकहिताचे उपक्रम राबविल्याबद्दल कुर्ली ग्रामस्थांतूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण निमित्त बीज संकलन उपक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील कोडणी रोडवरील अंकुर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *