संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सिध्देश्वर साहित्य वेदिकेतर्फे युपीएससी परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या साहित्या आलदकट्टी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सन्मान कार्यक्रम निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात पार पडला.
यावेळी बोलताना साहित्या आलदकट्टी म्हणाल्या सिध्देश्वर साहित्य वेदिकेच्या सत्काराचे आपणाला मोठा आनंद झाला आहे. वेदिकेचा सत्कार आपणाला प्रेरणादायी ठरल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कवियत्री हमीदाबेगम देसाई, प्रेमा कुंभार, उषा रवदी, संगिता कुंभार, रेखा पुजारी महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.
