संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन सविता कुंभार यांनी केले.
यावेळी बोलताना योग शिक्षक पुष्पराज माने म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या देशभक्तीला अनुसरून केंद्र सरकारने नेतजींची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगितले. यावेळी योगशिक्षक परशुराम कुरबेट, मलप्पा कुरबेट, रावसाहेब कंबळकर, योग साधक उपस्थित होते.