संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर-गोटूर येथील पोदनपूर पंचकल्याण महोत्सव महाप्रसाद सेवन करुन गडबडीने नांगनूर तालुका गडहिंग्लज गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या दोन महिला सिफ्ट अपघातात गंभीर जखमी झाल्या. त्यांना लागलीच उपचारार्थ गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अपघातातील गंभीर जखमी वृध्दा मालूताई अप्पासाहेब नाशीपुडी (वय 65) राहणार नांगनूर तालुका गडहिंग्लज मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. जखमी शोभा शिवाजी रेडेकर (वय 60) राहणार नांगनूर तालुका गडहिंग्लज यांच्यावर उपचार केले जात आहेत.
अपघाताची समजलेली माहिती अशी संकेश्वर-गोटूर येथील पोदनपूर येथे पंचकल्याण महोत्सव आजपासून प्रारंभ झाले आहे. सदर कार्यक्रमात नांगनूर येथील भक्तगण देखील सहभागी झाले आहेत. नांगनूरच्या मालूताई अप्पासाहेब नाशीपुडी आणि शोभा रेडेकर या महिलांनी महाप्रसाद सेवन करुन गावाकडे जाण्यासाठी पुणे-बेगळूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना निपाणीकडून बेळगांवकडे भरवेगात निघालेल्या सिफ्ट कार क्रमांक केए 23/एम ए.1222 च्या धडकेत गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना लागलीच उपचारार्थ गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे काम संकेश्वर पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी केले. उपचारादरम्यान मालूताई नाशीपुडी मरण पावल्या आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन मोठा रक्तस्राव झाल्याने त्या मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. संकेश्वर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून स्विफ्ट चालकाला ताब्यात घेऊन पोलिस अधिक तपास करताहेत.
Check Also
हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
Spread the love हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …