संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री पार्श्वलब्धिपुरम येथील नूतन जिनालयमध्ये प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या श्री पार्श्र्वनाथ मूर्तीचे संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल येथे आगमन होताच जैन बांधवांनी भक्तीमय वातावरणात स्वागत केले. आचार्यदेव पूज्य विक्रमसेन म.सा आदि,पूज्य साध्वीवर्या ऋतुप्रज्ञाश्रीजी म.सा आदि यांच्या दिव्य सानिध्यात आणि मार्गदर्शनाखाली श्री पार्श्वनाथ मूर्तीची राणी चन्नम्मा सर्कल येथून दिगंबर बस्तीपर्यंत सवाद्य समवेत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत भक्तगणांना लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला. गावात ठिकठिकाणी भक्तगणांनी मूर्तीचे दर्शन घेत सहर्ष स्वागत केले. मिरवणुकीत ॲड एस. एन. जाबण्णावर, रत्नलाल मेहता, अण्णासाहेब पाटील, बाबूराव कोरडे, कन्हैया संघवी, किर्तीकुमार संघवी, अमित मेहता, महेश मेहता, गडहिंग्लज, खानापूर, कणगला हलकर्णी भागातील जैन समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संकेश्वर श्री पार्श्वलब्धिपुरम जीनालय येथे येत्या एप्रिल महिन्यात पार्श्वनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे.
Check Also
हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
Spread the love हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …