
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर जुना पुणे-बेंगळूर रस्ता चौपदरीकरणाचे काम चन्नम्मा सर्कल ते शेट्टीमनी यांच्या दुकानापर्यंत करण्यात आले आहे. शेट्टीमनी सिमेंट दुकाना समोरच्या रस्त्यावर खड्डा निर्माण झाल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होऊ लागली होती. याची दखल घेऊन नगरसेवक डॉ. मंदार हावळ यांनी स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डा मुरुमाने बुजविण्याचे कार्य केले आहे. त्याचबरोबर त्यांनी संकेश्वर-गडहिंग्लज रस्ता येथील कारेकाजी पेट्रोल पंप जवळच्या रस्त्यावर मुरुम टाकण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भाग पाडले आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नगरसेवक डॉ. मंदार हावळ म्हणाले, चन्नम्मा सर्कल ते शेट्टींमनी सिमेंट दुकाना पर्यंतचा जुना पुणे-बेंगळूर रस्ता चौपदरीकरण करण्यात आला आहे. शेट्टीमनी सिमेंट दुकानासमोरचा रस्ता खचून खड्डा निर्माण झाल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होऊ लागली होती. रस्ता मधोमध दुभाजकाची सोय नसल्याने दुचाकी चारचाकी वाहने तेथे फसू लागली आहेत. याकरिता आपण प्रथम शेट्टींमनी सिंमेट दुकानासमोरील रस्त्यावरील खड्डा मुरुमने बुजविण्याचे कार्य केले आहे. दुभाजका शेजारी सिमेंट पोती उभे करुन वाहनधारकांना सुचित करण्याचे काम देखील केले आहे. संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्यावरील कारेकाजी पेट्रोल पंप समोरच्या रस्त्यावर गटारीचे सांडपाणी थांबून राहिल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होऊ लागली होती. याची दखल घेऊन आपण तसेच संतोष मुडशी, महेश हट्टीहोळी, कुमार कब्बूरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगून रस्त्यावर मुरुम टाकण्यास भाग पाडले असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta