संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील अंकले रस्ता कन्नड उच्च प्राथमिक शाळेत हळदीकुंकू कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. शाळा सुधारणा समिती, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय मुलींनी आपल्या आईची पाद्यपूजा करुन आर्शीवाद घेतला. सभेत शिक्षिकांनी उपस्थित मातांची ओटी भरुन हळदीकुंकू कार्यक्रम पार पाडला. सभेत सीआरपी एम. एस. पुजारी, मुख्याध्यापिका श्रीमती पी. सी. बडिगेर, एसडीएमसी अध्यक्ष इरफान कागले, उपाध्यक्षा श्रीमती राजेश्री गस्ती, एसडीएमसी सदस्यांनी भाग घेऊन शाळेला आवश्यक सवलत मिळवून देण्याच्या विषयावर चर्चा केली. शाळेला आवश्यक उपकरणे वस्तू देण्यास देणगीदारांनी सहमती दर्शवली आहे. शाळेची प्रगती कशी साधावयाची, राष्ट्रीय शिक्षण निती आणि गैरहजर विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी कोणते उपाय करावेत. याविषयावर चर्चा करण्यात आली. पालकांनी घरी मुलांचा अभ्यास कसा करुन घ्यावा. याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका श्रीमती एस. एन. हट्टीकर, एम. एस. सननाईक, के. सी. राजापूरे, आर. एस. भंडारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सभेला शालेय मुलींच्या आई-वडीलांनी उपस्थित राहून राष्ट्रीय शिक्षण नितीची माहिती घेतली.