संकेश्वर (प्रतिनिधी) संकेश्वर हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांच्या उपस्थितीत कारखान्याची व्हर्चिवल सर्वसाधारण सभा पार पडली. उपस्थितांचे स्वागत कारखाना व्यवस्थापक संचालक सातप्प कर्किनाईक यांनी केले. सभेत हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत अविरोध निवड झालेल्या संचालक मंडळाची घोषणा करण्यात आली. नूतन संचालकांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. नूतन संचालकांची नावे अशी अशोक बसवंतप्पा पट्टणशेट्टी (हुक्केरी), बसप्पा लगमप्पा मरडी (कोटबागी), प्रभूदेव बसगौडा पाटील (अंम्मीणभांवी), सुरेंद्र शंकर दोडलिंगण्णावर (यल्लीमन्नोळी), जुने जाणते संचालक बाबासाहेब परप्पा आरबोळे (मुगळी तालुका गडहिंग्लज), बसवराज शंकर कल्लट्टी (नोगनीहाळ), निखिल उमेश कत्ती (बेल्लद बागेवाडी), शिवनायक विरभद्र नाईक (कोचरी), श्रीशैल्यप्पा बसवाणेप्पा मगदूम (घोडगेरी), सुरेश बसलिंगप्पा बेल्लद (कब्बूर), बी गटातून संकेश्वरचे उद्योजक शिवपुत्रप्पा ऊर्फ अप्पासाहेब शिरकोळी निवडले गेले आहेत. सभेनंतर मंत्री उमेश कत्ती यांनी नूतन संचालकांची बैठक घेऊन सर्वानुमते कारखान्याचे नूतन अध्यक्ष-उपाध्यक्ष यांच्या नावाची घोषणा केली.
कारखान्याचे नवर्निवाचित अध्यक्ष निखिल कत्ती, उपाध्यक्ष श्रीशैल्यप्पा मगदूम व नूतन संचालकांचे विशेष अभिनंदन मंत्री उमेश कत्ती, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, बसवराज बस्तवाडी, प्रशांत पाटील सह अनेक मान्यवरांनी केले आहे.