संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर मड्डी गल्लीतील डॉ. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पाटील केअर हॉस्पिटलचा पहिला वर्धापनदिन रुग्णांना फळ वाटप करुन साजरा केला. कोरोनाच्या संकट काळात डॉ. चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांना धैर्यने सामोरे जाण्यास प्रवृत केलेले कार्य स्तुत्य ठरले आहे. संकेश्वरात अल्पावधीत उत्तम रुग्णसेवेने ते लोकांच्या परिचयाचे बनले आहेत. डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या मनामध्ये गोरगरिब कष्टकरी रुग्णांविषयी असणारी तळमळ लोकांना भावली आहे. त्यामुळे डॉ. चंद्रकांत पाटील हळुवारपणे लोकांच्या हृदयात आपले स्थान भक्कम करतांना दिसताहेत. त्यांनी आपल्या हॉस्पिटलचा पहिला-वहिला वर्धापनदिन रुग्णांना फळ वाटप करुन त्यांच्या आरोग्याची विचारपूस करीत साजरा केला आहे. रुग्णांना फळ वाटप कार्यक्रमात डॉ. समीर, आनंद पाटील, विशाल मन्नीकेरी, दयानंद आलुरी, राहुल आदींनी आपला सहभाग दर्शविला.
Belgaum Varta Belgaum Varta